राशन अपना अधिकार : आपणास किती रेशन मिळते आणि दुकानदार योग्य रेशन पुरवठा करतो का? हे ‘मोबाईलच्या’ साह्याने कसे पहाल…
Ration Own Right: How much ration do you get and does the shopkeeper supply the right ration? How to watch it with the help of 'mobile'
केंद्र सरकारने (Central Government) व राज्य सरकारने नुकतेच कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये दिवाळीपर्यंत मोफत रेशन (Free rations) मिळण्याचे जाहीर केले होते, सर्वसामान्य नागरिकांसाठी रेशन वेळेवर व योग्य मिळणे हा त्याचा अधिकार आहे. रेशन आपल्याला रेशनकार्ड (Ration card) वर सरकार किती उपलब्ध करून देते याची कल्पना नसते, त्यामुळे अनेकदा दुकानदार याचा गैरफायदा (Disadvantage) घेतात.
चला जाणून घेऊयात सरकारकडून आपणास किती रेशन मिळते व दुकानदार आपणास योग्य रेशन पुरवठा करतो का हे पाहण्याची अगदी सोपी पद्धत आहे. सर्व माहिती पाहण्याकरिता तुम्हाला अन्न व नागरी पुरवठाच्या वेबसाईट वर जावे लागेल.
http://mahaepos.gov.in/
चला झटपट जाणून घ्या; संपूर्ण ‘कांदा पिक’ लागवड पद्धत फक्त एका क्लिकवर…
या वेबसाईटवर गेले असता, डाव्याबाजूला आर सी (R.C.) डिटेल्स हा पर्याय उपलब्ध होईल, त्यावर क्लिक करा. आरसी डिटेल्स मध्ये कोणत्या महिन्यात डिटेल्स हवे आहे, तो महिना व वर्ष सिलेक्ट करा, यासाठी तुम्हाला तुमच्या रेशन कार्ड वरील १२ अंकी आरसी कोड (12 digit RC code on ration card) लिहायचा आहे. त्यानंतर सबमिट करा.
हरियाणातील नरेश यांनी “ह्या शेतीपूरक” व्यवसायातून कमवले, वीस लाख रुपये वार्षिक उत्पन्न
शेती व तंत्रज्ञान: शेतीसाठी आले आहे, “फोर इन वन यंत्र” पहा काय आहेत याची वैशिष्ट्ये..!
समिट केल्यानंतर तुम्हाला सर्व डिटेल्स उपलब्ध(Details available) होतील, तुम्हाला सरकार कडून किती धान्याची उपलब्धता होते याची माहिती मिळू शकेल. हे सर्व तुम्हाला इनटायटलमेंट फॉर आर सी (Entitlement for R.C.) या पर्यायांमध्ये उपलब्ध होणार आहे. वितरण संबंधित काही तक्रार असल्यास (If there are any complaints regarding delivery) १८०० २२ ४९५० व १९६७ या क्रमांकावर आपली तक्रार नोंदवू शकता.
हेही वाचा:
2. Weather Update : अतिवृष्टीचा धोका टाळला, पुढील पाच दिवसात या जिल्ह्यात पाऊसाची शक्यता…