ताज्या बातम्या

Ration Card | रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी! गुढीपाडवा आणि आंबेडकर जयंतीनिमित्त मिळणार ‘आनंदाचा शिधा’

Ration Card | Good news for ration card holders! 'Happiness ration' will be available on the occasion of Gudi Padwa and Ambedkar Jayanti

Ration Card | रेशन कार्डधारकांसाठी एक उत्तम बातमी आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या सोमवार (11 मार्च) रोजी झालेल्या बैठकीत राज्यात गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत, 1 कोटी 69 लाख शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा देण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले. यासाठी 550 कोटी 57 लाख रुपये खर्च येणार आहे आणि मंत्रिमंडळ बैठकीत या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे.

  • या योजनेचा लाभ कोणाला मिळेल?
  • अंत्योदय अन्न योजनेतील 25 लाख लाभार्थी
  • 1.37 कोटी प्राधान्य कुटुंब
  • 7.5 लाख शेतकरी
  • शिधापत्रिकाधारकांना काय मिळेल?
  • 1 किलो रवा
  • 1 किलो चणाडाळ
  • 1 किलो साखर
  • 1 लिटर सोयाबीन तेल

वाचा | Crop Loan | मोठी बातमी ! केंद्राकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! १० मिनिटात शेतकऱ्यांना मिळेल १.५ लाख रुपये कर्ज!

आनंदाचा शिधा योजना काय आहे?
महाराष्ट्र सरकारने ही योजना राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना मदत करण्यासाठी सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, ‘आनंदाचा शिधा’ नावाचे अन्नधान्य किट 100 रुपये किंमतीत दिले जाते. यामध्ये 1 किलो खाद्यतेल, 1 किलो रवा, 1 किलो चणा डाळ आणि 1 किलो साखर असते. ही योजना 2022 मध्ये सुरू करण्यात आली होती आणि आता दिवाळी, दसरा आणि गुढीपाडवा सारख्या सणांच्या निमित्ताने शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ वितरित केला जातो.

Web Title | Ration Card | Good news for ration card holders! ‘Happiness ration’ will be available on the occasion of Gudi Padwa and Ambedkar Jayanti.

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button