Ration Card Grain | महत्त्वाची बातमी! आता ‘या’ शेतकऱ्यांना रेशन कार्डवरील धाण्याऐवजी मिळणार पैसे, जाणून घ्या किती?
Ration Card Grain | विदर्भ मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आता रेशनऐवजी दरमहा १७० रुपये रोख मिळणार आहेत. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. यापूर्वी या रेशन कार्डधारक (Ration Card Grain) शेतकऱ्यांना दोन रुपये किलो तांदूळ आणि तीन रुपये किलो गव्हाचा लाभ दिला जात होता. मात्र, आता भारतीय अन्न महामंडळाने धान्य पुरवठा बंद केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
काय आहे ही योजना?
भारतीय अन्न महामंडळाने या शेतकऱ्यांना आता धान्य पुरवठा करणे बंद केले आहे. त्यामुळे सरकारने या शेतकऱ्यांना आर्थिक (Financial) मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, शेतकरी रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांना दरमहा 170 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत.
कोणत्या शेतकऱ्यांना मिळेल हा लाभ?
विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या जिल्ह्यांमध्ये राहणारे आणि एपीएल शेतकरी रेशन कार्ड धारक असलेले शेतकरी या योजनेचे लाभार्थी आहेत.
कसे मिळेल हा लाभ?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतःच्या बँक खात्याची माहिती आणि रेशन कार्डची प्रत संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराकडे द्यावी लागेल.
किती जणांना मिळणार आहे हा लाभ?
जिल्ह्यात सुमारे 2466 एपीएल शेतकरी रेशन कार्डधारक आहेत. यापैकी 8746 लाभार्थ्यांच्या खात्यात जुलैपर्यंतची रक्कम जमा करण्यात आली आहे.
वाचा: ब्रेकिंग! फक्त ‘या’च महिलांना मिळणार मोफत 3 गॅस; सरकारचे नवे नियम जारी
तालुकानिहाय माहिती
आर्ची – 1,186
देवळी – 4,191
हिंगणघाट – 1,966
वर्धा – 1,403
कशी मिळेल ही रक्कम?
शेतकऱ्यांना संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराकडे अर्ज द्यावा लागेल.
अर्जासोबत बँक पासबुकची पहिली पान आणि रेशन कार्डची पहिली व शेवटची पान जोडावी लागेल.
यानंतर ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
हेही वाचा:
• शेतकऱ्यांसाठी खुशखबर! कापूस आणि सोयाबीन उत्पादकांच्या खात्यावर ९६ कोटींचे अर्थसहाय्य जमा