Ratan Tata | रतन टाटा यांच्या ट्विटने चाहते गोंधळले! क्रिकेटविषयी काय म्हणाले?
Ratan Tata | Ratan Tata's tweet confused fans! What did you say about cricket?
Ratan Tata | उद्योगपती रतन टाटा यांनी सोमवारी एक ट्विट करून क्रिकेटशी आपला दूरदूरपर्यंत संबंध नसल्याचं स्पष्ट केलं. सोशल मीडियावर त्यांच्या नावाने केल्या जाणाऱ्या दाव्यांना त्यांनी फेटाळून लावलं.
टाटा यांनी ट्विटमध्ये म्हटलं, “माझ्या नावाने केल्या जाणाऱ्या दाव्यांना मी फेटाळून लावतो. आयसीसी किंवा दुसऱ्या कोणत्याही क्रिकेट संस्थाला मी क्रिकेटशी संबंधित कोणत्याही गोष्टींबद्दल सल्ला दिलेला नाही. (Ratan Tata) सोशल मीडियावर माझ्याबद्दल व्हायरल होणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका.”
वाचा :
सोशल मीडियावर टाटा यांनी राशिद खानला १० कोटी रुपये देण्याचं आश्वासन दिलंय असा दावा करण्यात येत होता. मात्र, टाटा यांनी या दाव्याला फेटाळून लावलं. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं, “माझा क्रिकेटशी दूरदूरपर्यंत संबंध नाही. कोणत्याही खेळाडूला दंड करण्यासाठी किंवा बक्षीस देण्यासाठी मी आयसीसी किंवा इतर संस्थेला सल्ला दिलेला नाही.”
टाटा यांचा हा स्पष्टीकरणाचा ट्विट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. अनेकांनी टाटा यांच्या स्पष्टीकरणाचे स्वागत केलं आहे.
हेही वाचा :
Web Title : Ratan Tata | Ratan Tata’s tweet confused fans! What did you say about cricket?