हवामान

Rain Update | आज राज्यातील ‘या’ भागांत विजांच्या कडकडाटासह होणार पाऊस; जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Rain with lightning will occur in 'these' parts of the state today; Know which districts are alerted?

Rain Update | अरबी समुद्रातील कमी दाब प्रणालीमुळे कोकणासह दक्षिण मध्य महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पाऊस पडत आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे आज (ता. २) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांसह पावसाची (Rain Update) शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू आहे. पुढील दोन दिवसांत पश्‍चिम आणि मध्य भारताच्या आणखी काही भागांतून मॉन्सून परतण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातही ठळक कमी दाबाचे क्षेत्र पश्‍चिम बंगाल आणि झारखंड परिसरावर आहे.

ही प्रणाली वायव्येकडे सरकत आहे. यातच कोकणात असलेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र दक्षिण मध्य महाराष्ट्राकडे सरकले आहे. ही प्रणाली हळूहळू निवळण्याची शक्यता आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे कोकणासह दक्षिण मध्य महाराष्ट्रात हलक्या ते जोरदार सरी कोसळत आहेत. आज (ता. २) राज्यात विजांसह पाऊस पडण्यास पोषक हवामान आहे. संपूर्ण विदर्भासह, मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर मराठवाड्यातील लातूर, धाराशिव जिल्ह्यात विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

वाचा : “या” जिल्ह्यात विजांसह पावसाचा इशारा; हवामानात मोठे बदल, या तारखेला कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढणार..

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट)
सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशीव
बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली हवामान विभागाने नागरिकांना सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.

सुरक्षा उपाययोजना
घराबाहेर पडताना निवारा घेणे.
वीज खांब, झाडे, इमारतींपासून दूर राहणे.
वाहन चालवताना सावधगिरी बाळगणे.
पाण्याचे निचरा होण्यास मदत करणे.
हवामान विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करून आपण आपले आणि इतरांचे रक्षण करू शकतो.

हेही वाचा :

Web Title: Rain with lightning will occur in ‘these’ parts of the state today; Know which districts are alerted?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button