हवामान

Rain Forecast | शेतकऱ्यांवर पुन्हा मेघराजा महेरबान! आज ‘या’ ठिकाणी विजांसह होणार पाऊस; जाणून घ्या तुमच्या भागात पडणार का?

Meghraja Meherban again on the farmers! Today it will rain with lightning; Find out if it will fall in your area?

Rain Forecast | ऑक्टोबर महिन्यातही राज्यात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आज, २२ ऑक्टोबर रोजी कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांसह पावसाची (Rain Forecast) शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामान असेल. मॉन्सूनने देशाच्या निरोप घेतला असून, दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे (ईशान्य मॉन्सून) दाखल झाले आहेत. बंगालच्या उपसागरात ठळक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. यामुळे पूर्व किनारपट्टीवर ढगांची गर्दी झाली आहे. राज्याच्या अनेक भागात ढगाळ हवामान असून, तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.

कमाल तापमानात वाढ
ढगाळ हवामानामुळे राज्याचे कमाल तापमान कमी अधिक होत आहे. शनिवारी, २१ ऑक्टोबर रोजी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये डहाणू येथे राज्यातील उच्चांकी ३६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सोलापूर येथे तापमान ३६ अंशांवर होते. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आज कोकणातील चार जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच ढगाळ हवामान असेल. दुपारी किंवा संध्याकाळी पावसाचा जोर वाढू शकतो. उर्वरित राज्यात ढगाळ कोरड्या हवामानसह, तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज आहे.

वाचा : Rain Update | आज राज्यातील ‘या’ भागांत विजांच्या कडकडाटासह होणार पाऊस; जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा
पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तसेच, उन्हाचा चटका कमी होईल. शनिवारी सकाळपर्यंतचे राज्यातील कमाल तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) पुणे ३२.३, जळगाव ३५.४, कोल्हापूर ३३.५, महाबळेश्वर २५.६, नाशिक ३३.४, सांगली ३३.०, सातारा ३१.६, सोलापूर ३६.०, सांताक्रूझ ३५.९, डहाणू ३६.६, रत्नागिरी ३४.६, छत्रपती संभाजीनगर ३२.५, नांदेड ३४.२, परभणी ३४.४, अकोला ३५.७, अमरावती ३२.२, बुलडाणा ३३.५, ब्रह्मपूरी ३४.८, चंद्रपूर ३२.८, गडचिरोली ३३.०, गोंदिया ३३.०, नागपूर ३२.६, वर्धा ३२.५, वाशीम ३४.२, यवतमाळ ३३.०. उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे डहाणू ३६.६, सोलापूर ३६.

हेही वाचा :

Web Title: Meghraja Meherban again on the farmers! Today it will rain with lightning; Find out if it will fall in your area?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button