हवामान

पुढील पाच दिवस पावसाचे; ‘या’ तारखेपर्यंत पेरणी करने टाळा – कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आव्हान…

Rain for the next five days; Avoid sowing till this date - Agriculture Department challenges farmers

वाशीम ( नागपूर) : पुढील पाच दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून (From the weather department) वर्तवण्यात येत आहे, नागपूर हवामान विभागाने वाशिम जिल्हा आणि परिसरात पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई न करता 17 जून पर्यंतपेरणी न करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना दिले आहे.

हेही वाचा : SBI बँकेतमध्ये खाते असलेल्यांनी, ‘हे’ काम करा अन्यथा सबसिडी विसरा!

[metaslider id=4085 cssclass=””]

जिल्ह्यामधील काही भागांमध्ये जोरदार पेरणीची तयारी चालू आहे, विदर्भामध्ये 10 जून ते 13 जून च्या दरम्यान जोरदार विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कृषी विभागाच्या वतीने दुबार पेरणीचे (Double sowing) संकट टाळण्याकरिता 17 जून पर्यंत पेरणी न करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला जात आहे.

शेतकरी बांधवांनी पेरणी करते वेळी काही विशेष गोष्टींची दक्षता घ्यायला हवी, जसे की शेतीसाठी लागणारे सर्व बियाणे खरेदी अधिकृत परवानाधारक (Authorized Licensee) विक्रेत्यांकडूनच करावी. त्याचप्रमाणे पेरणी करताना खरीपाची पेरणी ७५ ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करण्याबाबतची शिफारस कृषि विद्यापीठाने (University of Agriculture) केली आहे.

हेही वाचा : जनावरांमध्ये आढळणारा,’लाळ्या खुरकुताचा रोगाचा’ प्रभाव झाला आहे हे कसे ओळखाल?

महाराष्ट्र मध्ये सर्व जिल्ह्यांना, पुढील पाच दिवसांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आले आहे. हवामान तज्ज्ञ के एस होसाळीकर (Meteorologist KS Hosalikar) यांच्या मते मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि कोकणात पुढचे 5 दिवस अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सतर्क (Citizens alert) राहणे गरजेचे आहे, तसेच विजांचा कडकडाट सुरू असताना नागरिकांनी घराबाहेर जाणे टाळावे.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:

हेही वाचा :


1)सिंचन व ठिबक सिंचन करता मिळणार अनुदान! 2021 मध्ये किती टक्के मिळणार अनुदान वाचा सविस्तर पणे..

2)सोयाबीन ऐवजी शेतकऱ्यांनी ‘या’ पिकाचा विचार करावा – डॉ. विद्या मानकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button