ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Weather | पुढचे 4 दिवस राज्यात ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांच्या चिंतेत पडणार का भर?

Weather | राज्यात पाऊस गेल्या 24 तासांत विसावला आहे. तसेच राज्यातील अनेक भागात अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली. ज्यामुळे शेतकऱ्यांची शेतीतील (Agriculture) पिके वाहून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक (Financial) नुकसान झाले आहे. नुकताच शिंदे सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दुप्पटीने मदत जाहीर केली आहे. आता पुन्हा काही ठिकाणी मुसळधार पाऊस (Weather update in Maharashtra) पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्यामुळे आता पुन्हा एकदा शेतीतील (Agriculture in Maharashtra) पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे.

वाचा: काय सांगता? ‘या’ तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकरी एकाच शेतात घेऊ शकतात 4 पिके अन् लाखाचे होतील 5 लाख

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
राज्यातील काही जिल्ह्यांना मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 11 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्हयांना येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. त्याचबरोबर कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांना तुरळक पावसाची पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्याचवेळी विदर्भात देखील 13 आणि 14 ऑगस्ट रोजी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

वाचा: घरबसल्या कुटुंबातील सदस्याचे नाव कमी किवा नवीन करण्याची प्रक्रिया जाणून घ्या…

शेतकऱ्यांच्या चिंतेत पडणार का भर?
राज्यात मुसळधार पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे. यामुळे नक्कीच शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडण्याची शक्यता आहे. कारण याआधीच शेतकऱ्यांची पिके अतिवृष्टीमुळे भुईसपाट झाली आहे. ज्याची शेतकऱ्यांना शिंदे सरकारकडून नुकसान भरपाई मिळणार आहे. ही एक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Heavy rain will fall in these districts in the state for the next 4 days, why will the farmers worry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button