बागायती रब्बी ज्वारीची पेरणी ऑक्टोबर अखेरपर्यंत करता येते. तसेच बागायती करडईची पाच नोव्हेंबर पर्यंत पेरणी करता येते. यासाठी जमिनीत वापसा येताच पूर्वमशागतीची कामे करून घ्यावीत, असा सल्ला कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी दिला आहे. याविषयी सविस्तर माहिती घेऊया..
वाचा –
पावसामुळे पेरणी लांबणीवर –
रब्बी हंगामातील पेरणीसाठी ऑक्टोबरचा पहिला पंधरवडा उपयुक्त असतो. सततच्या पावसाने वापसा नसल्याने रब्बीच्या पेरण्या लांबणीवर पडल्या असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हस्तातील रब्बी ज्वारीची पेरणी उपयुक्त ठरते. पहिले चार दिवस पाऊस येण्यासाठी हानिकारक मानले जातात. कारण, पडलेल्या पावसामुळे जमीन दगडासारखी टणक बनते. या वर्षी अतिपावसामुळे वाफसा स्थिती महत्त्वाची राहील. कारण, ओल्यात पेरणी केली तर त्या जमिनी टणक बनतात. त्यामुळे पीक व्यवस्थापन करण्यासाठी अडचणी येतात. रब्बी ज्वारीच्या पेरणीसाठी वाफसा महत्त्वाचा असतो.
वाचा –
जमिनीत वापसा येताच पूर्वमशागतीची कामे करावी, असे सांगितले आहे. बागायती रब्बी ज्वारी पिकाची पेरणी ३१ ऑक्टोबर पर्यंत करता येते. जमिनीत वापसा येताच पूर्वमशागतीची कामे करून रब्बी सूर्यफूल पिकाची पेरणी लवकरात लवकर करा असा सल्ला ग्रामीण कृषी मौसम सेवाचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. कैलास डाखोरे यांनी दिला आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा