Pune Unlock : आजपासून पुण्यातील, ‘निर्बंधात शिथिलता’ पहा काय सुरु, काय बंद?
Pune Unlock: From today in Pune, see 'Restraint in Restrictions' What started, what closed?
पुणेकरांसाठी सुखद बातमी आहे, पुणे येथील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे, त्यामुळे पुणे अनलॉक झाले असून अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. अनेक गोष्टी सुरू होणार असून पाहुयात काय सुरू आहे, मग काय बंद राहणार आहे. (new rules and restriction in Pune amid Corona unlock)
या सेवा सुरू राहणार… व्यायाम शाळा, 50 टक्के क्षमतेने सलुन,ब्युटी पार्लर, हॉटेल्स 50 टक्के क्षमतेने दहा वाजेपर्यंत परवानगी, ग्रंथालय 50 टक्के क्षमतेने, हॉटेलमध्ये रात्री दहानंतर पार्सल सेवा सुरू.
सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुले राहणार..
👉 सर्व प्रकारची दुकाने, अभ्यासिका, ग्रंथालय (५० टक्के क्षमतेने), सार्वजनिक वाचनालये, कोचिंग क्लासेस, प्रशिक्षण संस्था (आसन क्षमतेच्या ५० टक्के), मॉल (५० टक्के क्षमतेने), व्यायामशाळा, सलून, ब्यूटी पार्लर, स्पा, आठवड्याचे सर्व दिवस (क्षमतेच्या ५० टक्के), मद्यविक्रीची दुकाने, खासगी कार्यालये (५० टक्के क्षमतेने), आऊटडोअर खेळ आठवड्याचे सर्व दिवस, इनडोअर खेळ सकाळी ५ ते ९ व दुपारी ५ ते ७ या वेळेत, सामाजिक, धार्मिक, राजकीय, मनोरंजन कार्यक्रमासाठी ५० लोक, लग्नासाठी हॉलच्या ५० टक्के क्षमतेने जास्तीत जास्त ५० लोकांची उपस्थिती
👉 अंत्यविधी, दशक्रियाविधी – २० लोक, महापालिकेच्या सभा, बैठका, सहकारी संस्थांच्या मुख्यसभा – ५० टक्के उपस्थितीत, महापालिकेच्या बागा, क्रीडांगणे पहाटे ५ ते सकाळी ९ आणि दुपारी ४ ते सायंकाळी ७
👉 रेस्टॉरंट, बार, हॉटेल रात्री १० पर्यंत (आसनक्षमतेच्या ५० टक्के), पीएमपीची बससेवा रात्री १०.३० वाजेपर्यंत, उद्योग नियमितपणे सुरू राहतील, चित्रपटगृह, नाट्यगृहे बंद
👉 शहरातील मॉल सुरू होणार असले, तरी चित्रपटगृहे व नाट्यगृहे अद्यापही सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली नाही.
सामान्य नागरिकांच्या खिशाला लागणार कात्री; ATM मधून पैसे काढणे होणार महाग…
हे बंद राहणार… धार्मिक स्थळे, मंदिरे बंद, सलून, पार्लर मधील A/C बंद, ग्रंथालये व इतर ठिकाणची A/C, बंद
हेही वाचा :
1)महाराष्ट्र मध्ये, ‘मान्सून’ आगमन तरीही महाबीज बियाण्यांचा व रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा
2)शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करताना, करा ‘या’ घटकाचा उपयोग उत्पादनात दहा टक्क्यापर्यंत होईल वाढ…