हवामान

The Rain| पुण्यात आणि महाराष्ट्रात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित|

The Rain| हवामान विभागाचे निवृत्त (retired) शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांच्या मते, जुलै महिन्यात पुणे आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे.

अधिक माहितीसाठी वाचा:

  • संपूर्ण देशामध्ये लेह, लडाख, पूर्व तामिळनाडू आणि पूर्वोत्तरेतील ७ राज्ये वगळता (Except) जुलै महिन्यात सरासरीच्या १०६ टक्क्यापेक्षा अधिक पाऊस अपेक्षित आहे.
  • महाराष्ट्रातील मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, उत्तर रत्नागिरी, नंदुरबार, नाशिक, धुळे, नगर, पुणे, सांगली, कोल्हापूर, पश्चिम सातारा, पूर्व सोलापूर, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर ह्या जिल्ह्यांमध्ये जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १०६ टक्के पावसाची शक्यता जाणवते.
  • दक्षिण रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच सातारा व सोलापूर जिल्ह्याच्या फलटण, माण, खटाव, माळशिरस, पंढरपूर तालुक्याच्या भागात जुलै महिन्यात १०६ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक पावसाची शक्यता खुपच अधिक (More) आहे.
  • जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, बुलडाणा, यवतमाळ या जिल्ह्यात आणि जिल्ह्यांच्या लगतच्या परिसरात ९६ ते १०४ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे.
  • जुलै महिन्यात तापमान हे सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.
  • जुलै महिना पावसाळी असेल आणि आकाश नेहमी आभ्राच्छादित स्थितीतून किमान तापमानात वाढ जाणवणार आहे.
  • ला-निना ऑगस्ट महिन्यात डोकावणार आहे.
  • जुलै महिन्यातील पावसासाठी समुद्र पृष्ठभागीय पाणी तापमान (temperature) म्हणजेच तटस्थेतील एन्सो स्थिती पूरकच समजावी.
  • जुलैतल्या पावसासाठी अरबी समुद्र व बंगाल उपसागरातील पाणी तापमान समान असणे ही वातावरणीय स्थिती पावसास अटकाव करणारी नाही.

वाचा:Tomato Tentury| टोमॅटोची शतकी खेळी, कांद्याची अर्धशतकी! मान्सूनमुळे भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले!

यामुळे पुणे आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे|

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button