lang="en-US"> चंदन शेतीसाठी आर्थिक सहाय्य द्या, शेतकऱ्यांची केली कृषी मंत्र्यांकडे मागणी…

चंदन शेतीसाठी आर्थिक सहाय्य द्या, शेतकऱ्यांची केली कृषी मंत्र्यांकडे मागणी…

सिन्नर : चंदन हे टिकाऊ व सुगंधी लाकूड असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात देखील याला फार मोठी किंमत मिळते. चंदन शेतीतून मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा होतो. त्यामुळे शेतकरी ही शेती करण्यास इच्छुक असतात ; परंतु चंदनाच्या शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक भांडवल व संरक्षणाची गरज असते. सिन्नर मध्ये ही शेती केली जात असून इथल्या शेतकऱ्यांनी आता कृषी मंत्री दादा भूसे यांच्याकडे चंदनशेतीसाठी शासनाने प्रोत्साहन द्यावे अशी मागणी केली आहे.

वाचा –

सुरक्षेसाठी येतो भरपूर खर्च

चंदनाच्या उत्पन्नास दीर्घ कालावधी (१३ वर्षाचा) लागत असून या काळात त्याची प्रचंड काळजी घ्यावी लागते. एवढी वर्षे या झाडांना सुरक्षा पुरवण्यासाठी सुरक्षा रक्षक तैनात करणे, चांगले कुंपण घालणे, सौरऊर्जा करंट चा वापर करणे, बागेभोवती काटेरी झुडपे लावणे, वाँच टॉवर उभारणे, सी सी टीव्ही कॅमेरे बसवणे इत्यादी गोष्टी कराव्या लागतात. यासाठी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना खर्च करावा लागतो.

वाचा –

अशी आहे शेतकऱ्यांची मागणी

एवढ्या मोठ्या प्रमाणावर भांडवल उभे करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते त्यामुळे सरकारने चंदन शेतीच्या लागवड व संगोपणासाठी आर्थिक मदत करावी, चंदन शेतीला विमा संरक्षण द्यावे, मायक्रो चीप किंवा ड्रोन कॅमेरा यासाठी शासकीय स्तरावर अनुदान द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Exit mobile version