योजना

गावकऱ्यांसाठी समृद्धी लेबर बजेट: शेतकरी, सरपंच यांच्यासाठी महत्वाचं अपडेट; वार्षिक कृती आराखड्याचे मोठे नियोजन..

Prosperity Labor Budget for Villagers: Important Update for Farmers, Sarpanch; Major planning of annual action plan.

वार्षिक कृती आराखड्यात २०२२ -२३ चे नियोजन संदर्भात महत्वपूर्ण परिपत्रक काढून सूचना देण्यात आलेल्या असून प्रत्येक शेतकर्यांना, प्रत्येक ग्रामीण भागातील नागरिकांना सरपंचाना, सदस्यांना, ग्राम पंचायताना (Citizens to Sarpanch, members, Gram Panchayat) माहित असणे गरजेचे आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme) समृद्धी लेबर बजेट २०२२-२३ वार्षिक कृती आराखडा (Prosperity Labor Budget 2022-23) तयार करण्याचे नियोजन कसे केले जाणार आहे याविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहे..

लेबर बजेट –

समृद्धी लेबर बजेट तयार करण्यासाठी यावर्षी जिल्हा व तालुका स्तरावर लेबर बजेट च्या अनुषंगाने प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

कसा असेल आराखडा –

रोजगार हमी योजना विभागाने “मी समृद्ध तर गाव समृद्ध , गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध” तत्व आहे. ग्रामीण भागातील शेतकरी/शेतमजूर व अन्य सामान्य जनता त्यांचे जीवनमान उंचावणे, गरिबी दूर करणे व शेतकरी/शेतमजूर कुटुबियांना लखपती करण्यासाठी अनेक नवीन बदल मागील काही काळात करण्यात आले आहेत.

शरद पवार ग्राम समृद्धी योजना चा हि समावेश –

राज्यात लागू केली असून योजनेमुळे ग्रामीण भागातील युवकांना, मजुरांना व शेतकरी कुटुबियांना शेतीपूरक जोडधंदे (Complementary agribusiness) करता येणार आहेत. तसेच गाव हा केंद्रबिंदू लक्षात न घेता कुटुंब हा केंद्रबिंदू लक्षात घेण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राम पंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व राज्य शासनाच्या इतर सहभागी यंत्रणा यांची जबाबदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जेणेकरून ग्रामीण भागातील गरजू कुटुंबाना दारिद्ररेशेच्या (poverty line) वर आणून त्यांची गरिबी दूर करता येईल. यासाठी कुटुंब केंद्रबिंदू लक्षात घेवून नियोजन करणे गरजेचे आहे.

वाचा : पीक विमा मंजूर: पुढच्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना पीक विमा व नुकसान भरपाई वाटप; कृषी मंत्र्यांचा “या” जिल्ह्यासाठी निर्णय..

वाचा : महाराष्ट्रमध्ये उडीद, कांदा, सोयाबीन, डाळिंब या पिकाला सर्वात जास्त भाव कुठे; आपण पाहूया सविस्तरपणे…

असा असेल नियोजन व सूचना- (७ सप्टेंबर २०२१ पासून कार्यवाही ला सुरुवात)

१) शिवार फेरी – संबधित गावातील सरपंच/ग्रामपंचायत प्रशासक, ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक, कृषी सहायक तलाठी व ग्राम स्तरावरील अन्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यासह उपस्थितीत शिवार फेरी काढण्यात येणार आहे. यासाठी जबाबदार अधिकार असणार आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद. हि कार्यवाही दिनांक ७ ते १४ सप्टेंबर २०२१ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

बैठकीत चर्चा केल्या जाणाऱ्या मुद्यांची माहिती…

१) मुख्य पाणलोट क्षेत्राचे निरीक्षण करणे.

२) नदी, तलाव, धरण, पाझर, इ. गाव तलाव, गाळ काढण्याबाबतचे निरीक्षण.

३) माथा ते पायर्या उपचार सीसीटी, एलबीएस, कंटूर बांध, शेततळे, कॉम्पार्त्मेंत बांध, ग्रेडेड कुतूर, विहीर फळबाग लागवड, वृक्ष लागवड, बिहार पॅटर्न इ. अनुषंगाने शिवाराचे निरीक्षण करण्यात येणार.

वाचाआधारकार्ड वरील नाव व जन्मतारीख बदलू शकता आता मोबाईलवर; पहा प्रोसेस काय आहेत?

वाचा लाल भेंडी चक्क 800 रु. किलोने विकली जातेय; ऐका शेतकऱ्याचे उत्पादन पाहून व्हाल चकित…

कुटुंब समृद्धीसाठी सर्वेक्षण – गरीब,गरजू शेतकरी शेतमजूर कुटुंबे लखपती कशी होतील याचे नियोजन केले जाणार आहे. ही कार्यवाही करण्याचा कालावधी २५ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत आहे.

अशा प्रकारे नियोजन विभागाच्या माध्यमातून एकूण १४ परिपत्रक काढण्यात आलेले आहेत. यामधून शेतकर्यांना, ग्रामीण भागातील नागरिकांना, रोजगार हमी योजनांचा लाभ मिळण्यासाठी या कृती आराखड्याचे काटेकोरपणे नियोजन केले जाणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button