कृषी सल्ला

उसाची योग्य लागवड केली तर मिळेल भरघोस उत्पन्न; फक्त शेतकऱ्यांनी “ही” काळजी घेतली पाहिजे..

ऊस लागवड करताना बेण्यावर कीटकनाशकाची फवारणी करणे गरजेचे आहे. फक्त महाराष्ट्रात नव्हे तर इतर राज्यातही उसाचे उत्पादन चांगले घेतले जाते. उसाचे ऊसाच्या बेण्याची लागवडच योग्य प्रकारे होत नाही त्यामुळे अपेक्षित उत्पादन मिळत नाही. त्यामुळे लागवड करतानाच योग्य काळजी घेतली तर त्याचा चांगला फायदा होईल. याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया..

वाचा –

उसाची लागवड पद्धत –

सरी काढून ऊसाची लागवड करा यासोबत सुपिक जमिनीची निवड करा. त्यानंतर लागवडीपूर्वीच किटकनाशकाची फवारणी ऊसाच्या बेण्यावर करा. सपाट जमिनीपासून योग्य त्या खोलीवर बेणे झाका. तर चांगल्या प्रतिच्या जमिनीवर 90 सेंमी अंतरावर लागवड करा आणि जमिन जर हलक्या प्रतिची असेल तर 75 सेंमी लागवड करणे फायदेशीर राहील.

अशी काळजी घ्या –

महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात ऊसाचे उत्पादन घेतले जाते. आजही राज्याच सरी काढूनच ऊसाची लागवड केली जाते. ही पध्दत योग्य असली तरी ऊसाला अनियमित वेळी पाणी दिल्याने त्याची उगवण योग्य पध्दतीने होत नाही. म्हणून योग्य वेळी पाणी द्या. यांचे तुमचाच फायदा होणार आहे.

वाचा

योग्य प्रमाणात पाणी –

ऊसाची लागवड केल्यानंतर तिसऱ्या आठवड्यात ऊसाला पाणी द्या.
पण कमी प्रमाणात पाणी दिल्यास बेण्याच्या वरचा जमिनीचा पापुद्रा हा निघून जाईल आणि ऊस उगवण्यास अधिकचा फायदा होणार होईल.
ऊसाची उगवण क्षमता वाढत नाही तोपर्यंत कमी प्रमाणात पाणी द्यावे लगणार आहे.
ऊसाला अधिकच्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असली तरी उगवण होण्यापूर्वी योग्य ती काळजी घ्या.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button