कृषी तंत्रज्ञान

सोयाबीनच्या नवीन वाणाची निर्मिती, एका एकारात मिळणार एवढे उत्पन्न…!

Production of new varieties of soybean, yield per acre…!

महाराष्ट्रात सोयाबीन एक महत्वाचे पीक घेतले जाते. सरकारी आकड्यानुसार गेल्या वर्षी सोयाबीनचे उत्पन्न हे जवळजवळ एकशे चाळीस लाख टन एवढी झाली होती. पुण्यातील एका संशोधन संस्थेने नवीन वाणाची निर्मिती केली आहे. या वाणा चे नाव MACS 1407 असे आहे. या वाणाची लागवड केल्यास शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळणार आहे. जवळ जवळ एका एकर क्षेत्रामध्ये 39 क्विंटल (39 quintals )एवढे उत्पन्न मिळणार आहे. परंतु हे बियाणे यावर्षी वापरायला मिळणार नाही.

हेही वाचा अशी करा’, सुगंधित गवातची लागवड आणि मिळावा भरघोस उत्पन्न!

सोयाबीनच्या नवीन वाणाची निर्मिती क्रॉस बिडिंग टेक्नॉलॉजी (Cross bidding technology) द्वारे करण्यात आली आहे. सोयाबीनचे नवीन वाण लीप रोलर,स्टॅम्प लाई,व्हाईट फ्लाई अफिडस, गर्दल बीटल या कीटकांपासून सुरक्षित आहे असा दावा करण्यात आलेला आहे. या वाणाची लागवड केल्यास एकरी 39 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन मिळू शकतो असाही दावा या संस्थेद्वारे करण्यात आलेला आहे.

पुण्यातील आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट (Agarkar Research Institute ) या वाणाचे संशोधन केले. ही संस्था भारत सरकारच्या आयसीएआर(ICAR) संस्थेअंतर्गत काम करते. या वाणा बद्दल केंद्रीय मंत्रालयाकडून सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. हे नवीन वाहन हे पुढील वर्षीच्या खरीप हंगामासाठी उपलब्ध होईल असे सांगण्यात आलेले आहे.

हेही वाचा: बाजारामध्ये आले आहे बनावट रेमडेसिवीर ! खरे इंजेक्शन कसे ओळखाल?

पुण्यातील आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट ने दिलेल्या माहितीनुसार हे नवीन वाण पुढील वर्षी उपलब्ध होणार असून ते जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैचा पहिला आठवडा या दरम्यान याची पेरणी करावी असे सांगितले गेले आहे. हे सोयाबीनचे पीक चौथ्या महिन्यात कापणीला येते.

हेही वाचा:मोठी बातमी: रब्बी हंगामातील या पिकाची 43 हजार कोटी रुपयांची केंद्र सरकारने केली मोठी खरेदी…

हेही वाचा:
१) आशादायक! अश्या पदधतीने कृषी उत्पन्न बाजार समिती ही बनणार कोवीड टेक केअर सेंटर…
२) ऑक्सीजन चा तुटवडा ही कमी होणार मोदी सरकारने घेतला हा महत्त्वाचा निर्णय सविस्तर वृत्तान्त

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button