ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

गोड ज्वारीपासून इथेनॉलची निर्मिती; आता शेतकऱ्यांना उत्पादनामध्ये मिळणार दिलासा..

गोड ज्वारीच्या (Sweet Sorghum) पिकापासून भविष्यात इथेनॉल बनवण्याचा विचार केला तर शेतकऱ्यांना यातून अनेक प्रकारचे फायदे होऊ शकतात. गोड ज्वारीच्या (Sweet Sorghum) इथेनॉल (Ethanol) पासून प्रदुषण आटोक्यात आणू शकतो. इथेनॉलच्या निर्मितीमुळे भविष्यात अन्न व चारा टंचाईची कमतरता भासणार नाही. गोड ज्वारीपासून (Sweet Sorghum) इथेनॉलची (Ethanol) निर्मिती कशी करता येईल? पाहुया सविस्तरपणे..

वाचा –

😊 पेरणीपासून काढणीपर्यंतचे यांत्रिणीकरण विकसित; या शेतकऱ्याचे आगळेवेगळे प्रयोग पहाच..

ज्वारीच्या पिकापासून (Sorghum Crop) इथेनॉल (Ethanol) च्या निर्मिती करू शकतो. इथेनॉलच्या (Ethanol) निर्मतीमुळे स्वस्तात उपलब्ध होणारे द्रव्य महागड्या पेट्रोलमध्ये मिसळून इंधनाची (Ethanol) दरवाढ नियंत्रणात आणता येईल. तसेच शेतकऱ्यांना ही चांगली उत्पन्न देणारा उत्पादक रोजगार (Productive employment) मिळेल. केंद्र सरकारच्या नवीन धोरणाप्रमाणे पेट्रोल मध्ये आपण पाच ते दहा टक्के इथेनॉलचा (Ethanol) वापर करू शकतो.त्यामुळे गोड ज्वारी सारखे पिक इंधनासाठी वापरले जाईल.

गोड ज्वारीपासून इथेनॉल प्रक्रिया –

ज्वारीच्या पिकाचा आणि त्यापासून इथेनॉल (Ethanol) बनविण्याच्या उद्योगाचा विचार करायला हवा. खरीप आणि उन्हाळी हंगामामध्ये गोड ज्वारीच्या ताटांचे उत्पादन 40 ते 45 टन प्रति हेक्‍टर एवढे मिळते. या ताटा पासून चरक्याने रस काढला तर 12 ते 15 हजार लिटर रस प्रति हेक्‍टर मिळू शकतो. त्याला आंबवण्याची प्रक्रिया करून आपण इथेनॉल (Ethanol) तयार करू शकतो. गोडज्वारीच्या रसामध्ये 10 ते 12 टक्के साखर असते. त्यामुळे आंबवण्याची प्रक्रिया योग्य असते. त्यामुळे त्यापासून साधारणतः सहा ते सात टक्के इथेनॉलची रिकवरी मिळते. इथेनॉल बनविण्याच्या उद्योगांमध्ये राज्याच्या ग्रामीण भागामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

वाचा –

इथेनॉल बनवणे शक्य होऊ शकते –

गोड ज्वारीपासून (Sweet tide) इथेनॉल (Ethanol) बनवण्यासाठी महाराष्ट्रात सध्या तरी नव्याने भांडवली गुंतवणूक करण्याची गरज नाही. सध्या राज्यात बंद पडलेल्या साखर कारखान्यातील यंत्रसामग्रीचा वापर करून इथेनॉल निर्मिती (Ethanol production) करणे शक्य होऊ शकते. गोड ज्वारीच्या (Sweet tide) ताटातील रस काढून उरणारा चोथा हा गुरांसाठी दर्जेदार चारा म्हणून वापरता येईल. त्यामुळे राज्यातील चाऱ्याच्या टंचाईची समस्या निकालात निघेल आणि दुग्धोत्पादन व्यवसायाला चालना मिळण्याची शक्यता आहे. तसेच गोड ज्वारीपासून इथेनॉल (Ethanol) बनवण्याचा कारखाना वर्षातील 270 दिवस सुरू राहू राहतो. काढले तर 1000 ते 1200 लिटर इथेनॉल उत्पादन प्रति हेक्‍टरी मिळू शकते.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button