2000 रुपयाची छपाई बंद! काय आहे ही बातमी; पहा सविस्तर…
काळा पैसा रोखण्यासाठी सरकारने, 2016 मध्ये, पाचशे व हजार रुपयांच्या नोटा यावर बंदी आणून दोन हजार रुपयांची नोट जारी केली. तसेच या बरोबर 100 आणि 50 रुपयांच्या नवीननोटा हे सुरू केल्या होत्या.
परंतु गेल्या दोन वर्षांपासून दोन हजार रुपयांची नवीन नोटा ची छपाई बंद करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षापासून सही दोन हजार रुपयाची नोट छापण्यात आली नाही. अशी माहिती केंद्र सरकारने लोकसभेत दिली. अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी असे सांगितले की, 30 मार्च 2018 पासून दोन हजार रुपयाची नवीन नोटाची छपाई अनुक्रमे,336.2 कोटी तर फेब्रुवारीमध्ये 249.9 कोटी इतकी छपाई झाली. म्हणजे यामध्ये घट झालेली दिसते.
पुढे ते म्हणाले,कोणतेही मूल्याचा व नोटा छपाई चा निर्णय तिच्या देवाणघेवाणीची मागणी रिझर्व बँक ऑफ इंडिया पूर्ण करते. परंतु 2019 नंतर दोन हजार रुपयाची एकही नोट छापण्यात आली नाही.
तर पाहूयात नोटा बंद झाल्यापासून(2016) ते आत्तापर्यंतची (2021) तर 2000 हजार रुपयांच्या नोटांची छपाई
2016-2017 354.2 cr
2017-2018 11.1 cr
2019-2021 0