PM KISAN

Prime Minister Kisan Samman |पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता लवकरच खात्यात येणार! 17 वा हप्ता मिळण्यासाठी काय काय करावे?

नवी दिल्ली, 10 जून 2024: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा केली आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 11.50 कोटी शेतकऱ्यांना या हप्त्यात प्रत्येकी ₹2000 मिळणार आहेत.

या योजनेचा 16 वा हप्ता 28 फेब्रुवारी 2024 रोजी जारी करण्यात आला होता. दर चार महिन्यांनी ₹2000 च्या तीन हप्त्यांमध्ये दरवर्षी ₹6000 ची आर्थिक मदत या योजनेतून शेतकऱ्यांना प्रदान करण्यात येते.

वाचा:Fruit Insurance | आनंदाची बातमी! या फळ चा होणार विमा योजनेत समावेश होणार!

17 वा हप्ता मिळण्यासाठी काय काय करावे?

  • शेतकऱ्यांनी ई-केवायसी (e-KYC) अपडेट करणे आवश्यक आहे. 5 ते 20 जून या काळात ईकेवायसी अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
  • जमिनीचा तपशील पोर्टलवर अपलोड केलेला आहे याची खात्री करा.
  • बँक खाते आधार कार्डशी लिंक केलेले आहे याची खात्री करा.
  • अर्ज करताना दिलेली सर्व माहिती योग्य आहे याची खात्री करा.

कधी आणि कसे मिळेल 17 वा हप्ता?

  • अधिकृत तारखेची घोषणा अद्याप झालेली नाही, परंतु अंदाजे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
  • पैसे थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे पाठवले जातील.

आजच ई-केवायसी अपडेट करा!

शेतकऱ्यांना विनंती आहे की, 17 वा हप्ता लवकर मिळण्यासाठी 5 ते 20 जून या काळात ईकेवायसी अपडेट करून घ्यावे. तसेच, योजनेशी संबंधित इतर कोणत्याही माहितीसाठी तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असल्यास खाली दिलेला ‘लाइक’ बटन दाबून आम्हाला कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button