ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

नाशिकचे टोमॅटो खाणार भाव! टोमॅटो उत्पादक शेतकरी होणार मालामाल…

Prices of Nashik tomatoes to be eaten! Tomato growers will be farmers

नाशिक : यावर्षी बऱ्याच शेतकऱ्यांना टोमॅटोने मालामाल केले आहे, बदलत्या हवामानामुळे व सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे परराज्यांमधील टोमॅटोचे ( tomatoes) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे या वर्षीही नाशिकचे टोमॅटो देशभर डंका वाजवतील अशी आशा व्यापारी वर्गाकडून व्यक्त होत आहे.

पिंपळगाव बाजार समितीत (Pimpalgaon Market Committee) टोमॅटोची आवक सुरु झाली असून सरासरी ५०० रुपये प्रतीक्रेट दर राहण्याचा अंदाज जाणकारांकडून वर्तविण्यात येत आहे. कर्नाटक राज्यामध्ये 70 टक्केहून अधिक टोमॅटो उत्पादकांचे नुकसान झाल्याने नाशिकचे टोमॅटोवर अवलंबून राहावे लागत आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडत (Supply falls short of demand) असल्याने यांनाही टोमॅटोला चांगला दर मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

नाशिककरांना या परिस्थितीच्या चांगलाच लाभ मिळू शकतो त्यासाठी शेतकऱ्यांनी पिकांची निगा घेऊन उत्पादन मिळविले तर टोमॅटोतून यंदा घसघशीत उत्पन्न मिळविण्याची मोठी संधी मिळू शकते असे जाणकारांचे म्हणणे आहे. गतवर्षी पिंपळगाव बाजार समितीत मध्ये देखील कोट्यवधी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता आहे.

वाचा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने मार्फत ठिबक सिंचनाला मिळणार 90 टक्के अनुदान…

पिंपळगाव बाजार समितीमध्ये दिल्ली, कोलकत्ता, उत्तर प्रदेश, बिहार येथून मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे या आठवड्यामध्ये टोमॅटोची आवक देखील वाढू शकते, सध्या चांदवड तालुक्यातून टोमॅटो विक्रीसाठी येत आहे. तरीही टोमॅटोचा बाजारभाव किमान १५० कमाल ३५० तर सरासरी २५० रुपये प्रतिक्रेट दर मिळत आहे.

राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोचे बाजार भाव पाहण्यासाठी खाली क्लिक करा :

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button