केंद्र सरकार ने शेतकरी बांधवांसाठी एक अभिनव उपक्रम आणला आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना सौर पंप मिळणार आहे.या योजनेची घोषणा 2018-19 अर्थसंकल्प मध्ये अरुण जेठली यांनी मंजूर केली. भारतामध्ये विजेची समस्या, जल तसेच मोसमी पाऊस या सगळ्या गोष्टी चा सामना शेतकरी मित्रांना करावा लागतो. म्हणून ही योजना आणली गेली आहे. केंद्र सरकारच्या या योजनेद्वारे त्यांच्या जमिनीवर सौर उर्जेचे पॅनेल आणि पंप लावून शेतीला पाणी देता येणार आहे. कुसुम योजनेअंतर्गत आतापर्यंत 20 लाख सौर पंप शेतकऱ्यांना दिले गेल्याची माहिती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होताना दिली होती. या योजने लाभ शेतकरी बांधवाना भरपूर होणार आहे.
👉 योजनेची वैशिष्टे:
🔸 शेतकऱ्यांना सौर उर्जा उपकरण बसवण्यासाठी 10 टक्के रक्कम भरावी लागणार आहे.
🔹 केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बँक(bank account ) खात्यामध्ये सबसिडीची रक्कम पाठवेल.
🔸 कुसुम योजनेमध्ये बँका शेतकऱ्यांना 30 टक्के रक्कम कर्ज(loan) स्वरुपात देतील.
🔹 सौर उर्जा प्लाँट (solar plant) शेतकरी मित्रांना लावण्यासाठी पडीक जमीनवर वापर करता येईल.
👉 सौर पंप मिळण्यासाठी कुठे अर्ज करता येईल :
या महायोजने अंतर्गत 3hp, 5hp, 7.5 hp क्षमतेचे सौर पंप देण्यात येणार आहेत. महाराष्ट्र मध्ये 1 लाख सौर पंप देण्याचे केंद्र सरकार कडून सांगण्यात आले. यातून शेतकऱ्यांच्या अडचणी कमी करण्याचा प्रयत्न आहे.
👉 लाभार्थी होण्यासाठी इथे अर्ज करा :
महाराष्ट्र मध्ये PM कुसुम योजनेचा फायदा घेण्यासाठी महावितरण च्या अधिकृत वेबसाईट जाऊन अर्ज करावा लागतो.
👉 यासाठी लागणारे कागतपत्र :
🔸 आधारकार्ड
🔹 जमिनी चा उतारा
🔸 बँकेचे पुस्तक
🔹 पाण्याचा स्रोत या सर्वांची झेरॉक्स. जलसंपदा विभाग, किंवा जलसंधारण विभागाचं पाणी उपलब्धतेबद्दलचं प्रमाणपत्र आवश्यक आहे.चला तर या योजनेचा भरपूर फायदा घेऊयात आणि थोडे जीवन सुखकर करूयात.
👉 ही माहित आवडली असेल तर आमच्या चॅनेल ला फॉलो करा :
हेही वाचा :
http://dhunt.in/dqXrB?s=a&uu=0x8c6bc5757bc78dff&ss=wsp
WEB TITLE: Pradhan Mantri Kusum Yojana will get solar pumps…