योजना

Yojana | बातमी कामाची! दुसरे अपत्य मुलगी झाल्यास मिळणार ६ हजार; राज्यात ‘ही’ जबरदस्त योजना जाहीर

News work! 6 thousand if the second child is a girl; 'This' tremendous scheme announced in the state

Yojana | पहिल्या अपत्यासाठी पाच हजार रुपयांची सरकारी मदत कायम ठेवतानाच आता दुसरे अपत्य मुलगी असेल तर महिलांना अधिकचे सहा हजार रुपये राज्य सरकार देईल. पंतप्रधान मातृवंदना योजना-२ (Pradhan Mantri Matruvandana Yojana -2) लागू करण्याची घोषणा सार्वजनिक आरोग्य विभागाने सोमवारी केली. आता हे पाच हजार रुपये दोन टप्प्यातच दिले जातील.

कुणाला मिळेल लाभ?
ज्या महिलांचे निव्वळ कौटुंबिक उत्पन्न प्रति वर्ष आठ लाख रुपयेपेक्षा कमी आहे तसेच किमान १८ वर्षे व कमाल ५५ वर्षे वय असलेल्या महिलांसाठी योजना असेल. दुसरे अपत्य जुळे झाले आणि त्यात दोन्ही मुली असतील किंवा एक मुलगी एक मुलगा झाला तरी एकाच मुलीसाठी लाभ दिला जाईल.

तुमच्या बाळाला लस दिली का ? नाही तर आजपासून येईल टीम घरी
सोलापूर विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिमेंतर्गत पहिली फेरी ७ ते १२ ऑगस्ट २०२३, दुसरी फेरी ११ ते १६ सप्टेंबर २०२३ या कालावधीत जिल्ह्यात अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात आलेली असून तिसरी फेरी दिनांक ९ ते १४ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी दिली.

वाचा : 1 हजार कोटींचा निधी वितरित: गर्भवती महिलांसाठी सप्टेंबरमध्ये विशेष सप्ताह व योजना; घ्या “या” योजनांचा लाभ..

याअंतर्गत नियमित लसीकरण सत्राचे आयोजन निश्चित केलेल्या दिवशी सुरू आहे. अतिरिक्त सत्राचे नियोजन हे नियमित लसीकरण सत्राचा दिवस वगळून इतर दिवशी अति जोखमीच्या भागात करण्यात येत आहे. झीरो ते दोन वर्षे वयोगटातील लसीकरणापासून वंचित सांगितले किंवा गळती झालेले लाभार्थी, दोन ते पाच वयोगटातील ज्या बालकांचे गोवर रुबेला लसीचा पहिला व दुसरा डोस राहिला आहे.

तसेच डीपीटी व ओरल लसीचा डोस राहिलेले लाभार्थी, गर्भवती महिला यांना लसीकरण कार्यक्रमांतर्गत दिल्या जाणाऱ्या लसीद्वारे लसीकरण करणे, ६ ऑगस्ट २०१८ किंवा त्यानंतर जन्मलेला बालकाचा या मोहिमेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे.

हेही वाचा :

Web Title: News work! 6 thousand if the second child is a girl; ‘This’ tremendous scheme announced in the state

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button