कृषी सल्ला

पॉवर टिलरचलीत सुधारित अवजारे; शेतीमध्ये “ही” अवजारे वापरा, वेळ आणि पैशांचीही होईल बचत..

सध्या शेतीचे विभाजन होत असल्याने मोठे क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांनी संख्या फारच कमी झालेली आहे. त्यामुळे त्यांना ट्रॅक्टर घेणे परवडत नाही. शेतीच्या कामासाठी मजूर मिळणेही अवघड झालेले आहे आणि चाऱ्याचे दर वाढल्यामुळे बैलजोडी ठेवणेही परवडत नाही शेतीचे काम बंद ठेवूनही चालणार नाही. यावर उपाय म्हणजे पॉवरटिलर वापरून शेती करणे हा एकमेव उपाय. याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया.

वाचा

1️⃣ केंद्र सरकारची “ही” योजना पाहिलीत का? शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार 50 टक्के सब्सिडी, लवकर घ्या या योजनेचा लाभ..

1) रोटाव्हेटर – पॉवर टिलर खरेदी करताना शेतकऱ्यांना विक्रेत्यांकडून रोटाव्हेटर हे एक अत्यावश्यक अवजार पुरवली जाते. हे अवजार पॉवर टिलर च्या मागील बाजूस जोडता येते. या अवजारांमध्ये एका फिरणाऱ्या दांड्यावर 14 ते 20 जमीन दाताळणारे फन नटबोल्टच्या साह्याने बसवलेले असतात. पॉवरटिलरच्या रोटाव्हेटरच्या साह्याने जमीन भुसभुशीत होते. एकाच वेळी नांगरणी आणि ढेकळे फोडण्यासाठी जमिनीला स्वतंत्रपणे कुळवाच्या पाळ्या घालण्याची आवश्यकता राहत नाही. त्याच प्रमाणे आंतरमशागत करता येते व 10 ते 15 सेंटिमीटर खोलीपर्यंत तणे समूळ काढली जातात. भातशेतीमध्ये रोटाव्हेटरने चिखलणीचे काम सुलभरीत्या व प्रभावीपणे करता येते. रोटाव्हेटरने मशागत करण्यासाठी तासात सव्वा ते दीड लिटर डिझेल लागते. एका दिवसात आठ तासात अंदाजे एक हेक्‍टर क्षेत्राची मशागत होते.

वाचा

2) बहुपीक टोकण यंत्र – या टोकणयंत्राचे वैशिष्ट्य म्हणजे दाणेदार खते व बियाणे यांचे एकाच वेळी पेरणी करता येते.
भुईमूग, सूर्यफूल, करडई, सोयाबीन, हरभरा, तूर, गहू, ज्वारीसाठी पिकांची टोकण करता येते.या यंत्रात दोन ओळीतील अंतर पिकाच्या आवश्‍यकतेनुसार 22.5, 30, 45, 60 सेंटीमीटर ठेवता येते. या यंत्राच्या साह्याने एका दिवसात 1 ते 1.5 क्षेत्रावर टोकण करून वेळेची आणि पैशांची बचत करता येते.

3) फवारणी यंत्र – पॉवरटिलर चलीत फवारणी यंत्राच्या साह्याने डाळिंब, संत्री, मोसंबी, लिंबू, इत्यादी फळबागांमध्ये प्रभावीरीत्या फवारणी करता येते.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button