योजना
ट्रेंडिंग

कुक्कुटपालन अनुदान : ‘कुक्कुटपालन’ करण्यासाठी ‘या’ योजनेतून मिळणार 5.25 लाख रुपयांचे अनुदान!

Poultry Grant: A grant of Rs. 5.25 lakhs will be given from 'Ya' scheme for 'Poultry'!

नाशिक : राज्यामध्ये अनेक भागांमध्ये आदिवासी बांधव राहतात, या आदिवासी बांधवांची प्रगती होण्याच्या उद्देशाने, आदिवासी विकास विभागाकडून (Department of Tribal Development) विविध योजना राबविल्या जातात. शेतीसोबतच कुकुट पालनाचा जोडव्यवसाय (Business) करून आर्थिक सुबत्ता (Economic well-being) निर्माण व्हावी या उद्देशाने आदिवासी विकास विभागाकडून विविध योजना राबविल्या जातात.

नाशिक, राजूर, कळवण, नंदुरबार, तळोदा, धुळे, शहापूर आणि पेण या कार्यक्षेत्रातील आदिवासींच्या स्वयंसहायता बचत गटांसाठी एकात्मिक कुक्कुटपालन योजनेच्या माध्यमातून (Through Integrated Poultry Scheme for Tribal SHGs) व्यावसायिक पद्धतीने कुक्कुटपालन (Poultry farming) व्यवसायासाठी अर्थसहाय्य करण्याच्या उद्दीष्टाने ही योजना राबविण्यात येणार आहे.

योजनेचा लाभ घेण्याकरिता बचत गटांचे काही निकष आवश्यक आहेत. बचत गटातील सर्व सदस्य हे अनुसूचित जमातीचे असावेत. बचत गटाचा बँकेकडे असलेल्या खात्यातील व्यवहार चालू असावा. शासन निर्णयात नमूद असणारी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि बचत गटातील सर्व सदस्यांचे रजिस्टर हमीपत्र हे पूर्ण असावेत.

या योजनेद्वारे, बचत गटांना शेड बांधण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे, तसेच कुक्कुटपालन याकरिता प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे. या योजनेद्वारे छोटे पक्षी, पशु खाद्य व आवश्यक साहित्य पुरविले जाणार आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थी बचत गटाला रूपये 5.25 लाख याप्रमाणे शासन अनुदान देणार आहे.

कुकुट पालन व्यवसाय यादी की यशस्वी होण्याकरिता, नामांकित कंपन्यांसोबत करार (Agreement) पद्धतीने योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या अधिक माहिती हवी असल्यास, एकात्मिक कुक्कुटपालन योजनेच्या अधिक माहितीसाठी व अर्ज दाखल करण्यासाठी संबंधित प्रकल्प कार्यालये यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

हेही वाचा :


1. कोविड प्रभावित राज्यांसाठी, केंद्रीय अर्थमंत्री यांची मोठी घोषणा! महत्वाच्या घोषनांचा थोडक्यात आढावा…

2. एलपीजी सब्सिडी बँक खात्यात जमा होते का? नाहीतर’ येथे’ करा तक्रार…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button