पोशिंद्यालाच मिळेना लाभ! शेतकऱ्यांनाच मिळेना मुख्यमंत्री अन्न योजनेचा लाभ वाचा सविस्तर बातमी…
Poshindyalaca not get the benefit! Farmers don't get the benefit of Mukhyamantri Anna Yojana Read detailed news
लातूर : काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने (Central Government) दोन महिन्याचे धान्य मोफत मिळणार असल्याचे जाहीर केले त्यासोबत राज्यसरकारने(By the state government) देखील एक महीने ते धान्य मोफत मिळणार असल्याचे जाहीर केले.
लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतील (mukhyamantri garib kalyan yojana) मोफत धान्याचा लाभ शेतकरी कुटुंबांना मिळणार नाही. शेतकरी जगाचा पोशिंदा होतो त्याच्या नशिबात अशा योजनेचा लाभ मिळत नाही, या योजनेचा प्रामुख्याने फायदा उर्वरित प्राधान्य कुटुंबांसह अंत्योदय योजनेच्या लाभार्थींना (Beneficiaries of Antyodaya Yojana) मिळणार आहे.
लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर ‘द ब्रेक चैन’ या वेळेस राज्य सरकारने पॅकेज जाहीर केले, यातूनच गरीब कल्याण अन्न योजनेतून एक महिन्याचे मोफत धान्य देण्याचे जाहीर देखील केले.मात्र, शेतकरी कुटुंबातील सदस्यांना हे मोफत धान्य देण्याचा निर्णय झालाच नाही.
या योजनेतून लाभार्थ्यांना तीन किलो गहू व दोन किलो तांदळाचे वाटप केले जाते तसेच राज्य सरकार कडून देखील प्रती सदस्यास तीन किलो गहू दोन किलो तांदूळ याचे वाटप होणार आहे. आत्तापर्यंत या योजनेचे लाभार्थी झालेल्या अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारक – ४१,३२७, अंत्योदय कुटुंबातील सदस्य संख्या – २,१५,८८८, प्राधान्य कुटुंबांतील शिधापत्रिकाधारक – ३,०२,७४२,प्राधान्य कुटुंबांतील सदस्य संख्या – १५,०४,८४५, शेतकरी कुटुंबातील सदस्य संख्या – ३,०६,८९९ ही आकडेवारी लातूर जिल्ह्यातील आहे. त्यामुळे या योजनेचा केंद्र सरकार व राज्य सरकार अशा दोन्हींकडून फायदा होणार आहे.
हेही वाचा :
1)आपल्या गावानुसार जमिनीचे शासकीय भाव ऑनलाइन कसे पहावे पहा फक्त एका क्लिकवर..