Lifestyle| नारळ खराब निघाला तर काय? धार्मिक आणि शास्त्रीय दृष्टीकोन|
Lifestyle| हिंदू धर्मात पूजा-पाठ आणि विविध धार्मिक विधींमध्ये नारळाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. नारळाला श्रीफळ मानले जाते आणि त्यात देवी-देवतांचा वास असल्याची श्रद्धा आहे. पूजेसाठी नारळ फोडला जातो आणि प्रसादाच्या स्वरूपात ग्रहण केला जातो. पण कधीकधी पूजेसाठी वापरलेला नारळ फोडल्यानंतर खराब निघत. अशा वेळी लोकांच्या मनात अनेक प्रश्न (Question) निर्माण होतात आणि याला शुभ-अशुभ संकेतांशी जोडले जाते.
नारळ खराब निघण्याचा अर्थ काय?
धार्मिक दृष्टिकोनातून विचार करता, नारळ खराब निघणे हे शुभ किंवा अशुभ असे निश्चितपणे सांगता येत नाही. (Lifestyle) काही लोकांचा असा विश्वास आहे की देवांनी प्रसाद स्वीकारला आहे आणि त्यामुळे नारळ खराब झाला आहे. तर काहीचा असा विश्वास (faith) आहे की हे नकारात्मक शक्तींचा संकेत असू शकतो.
तथापि, शास्त्रीय दृष्टिकोनातून नारळ खराब होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. नारळ योग्य प्रकारे साठवला नसेल, त्यात कुज किंवा इतर आजार असतील तर तो खराब होऊ शकतो. तसेच, हवामान आणि वातावरणातील बदलांमुळेही नारळ खराब होऊ शकतो.
वाचा Capricorn| नवीन राहू गोचरामुळे या 3 राशींवर होणार ‘पावसाळी’ धनलाभ|
नारळ खराब निघाल्यास काय करावे?
नारळ खराब निघाल्यास घाबरून जाण्याची गरज नाही. खालील गोष्टी लक्षात ठेवा:
- नारळ फोडण्यापूर्वी त्याची चांगल्या प्रकारे तपासणी (Inspection) करा. त्यात कुज किंवा इतर त्रुटी दिसत असल्यास दुसरा नारळ वापरा.
- नारळ योग्य प्रकारे साठवा. त्याला थंड आणि कोरड्या ठिकाणी ठेवा.
- पूजेसाठी नेहमी ताजे आणि चांगल्या दर्जाचे नारळ वापरा.
- नारळ फोडल्यानंतर तो त्वरित वापरा. जास्त वेळ ठेव नका.