कृषी सल्ला

जनावरांना ह्या एका कारणामुळे होऊ शकते विषबाधा, व जनावरांना विषबाधा होऊ नये म्हणून घ्या अशी काळजी…

Poisoning of animals can be caused by one of these causes, and care should be taken not to poison the animals.

जनावरांना चरत असताना खाण्याच्या माध्यमातून विषबाधा होऊ शकते. त्याकरता जनावरांच्या खान पानावर योग्य लक्ष देणे केव्हाही उचित ठरते. विषबाधा वेगवेगळे कारणांमुळे हे होऊ शकते. काहीवेळा बियाण्यात सोबत बुरशीनाशकांची पुडी दिली जाते पुडी निष्काळजीपणाने कुठेही फेकून दिल्यास जनावरे चरत असताना त्यांच्या खाण्यात जाण्याची शक्यता असते त्यामुळे देखील विषबाधा होऊ शकते. उपयोजना पाहणार आहोत आपण विषबाधाची शक्यता पाहणार आहोत.

📍या कारणांमुळे होऊ शकते विषबाधा:

🐄 जनावरांना बुरशीनाशकाची विषबाधा झाल्याचे आढळून येते. जर बुरशीनाशकाची पुडी पेरणी करताना निष्काळजीपणामुळे किंवा बरेचदा अजाणतेपणे शेतात फेकून दिली असेल, तर काहीवेळा जनावरे अशी पुडी चघळतात किंवा पूर्णपणे खाऊन टाकतात. अशा घटना खूप मोठ्या प्रमाणावर घडल्या आहेत.

🐄 बुरशीनाशकाची पुडी किंवा कीटकनाशकाचे डब्बे बांधावर फेकून दिली असेल तर मशागतीनंतर बैल किंवा इतर जनावरे त्या बांधावर चरण्यासाठी आणल्यावर गवताच्या बरोबरीने ही पुडी जनावरांच्या आहारात जाते. त्यामुळे विषबाधा होण्याची शक्यता असते.

🐄जनावरांच्या आहारात बुरशीनाशक पावडर जास्त मोठ्या प्रमाणात पोटात गेली असेल तर त्यांना तीव्र विषबाधा होऊन दगावू शकतात.

🐄 बुरशीनाशकाची विषबाधा ही बैलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येते. काही प्रमाणात सोयाबीन पेरणी केलेल्या शेताच्या बाजूस चरावयास सोडलेल्या गायी-म्हशींमध्येही आढळून येते.

📍विषबाधा टाळण्यासाठी उपाययोजना

१)बियाणे व बुरशीनाशकासोबत दिलेल्या मागर्दर्शक वाचावे व त्यावरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे.

२) बियाणे प्रक्रियावर बुरशीनाशक, कीटकनाशकांचा वापर करत असताना प्लॅस्टिक हातमोजे, गम बूट व टोपी परिधान करावी, जेणेकरून शेतकऱ्यांना विषबाधा होणार नाही.

३) बुरशीनाशक पावडर हाताळताना ती तोंडावाटे किंवा श्वसनातून शरीरात जाणार नाही याची काळजी घ्यावी.

४)बियाणे तसेच शेतीमध्ये लागणारी कीटकनाशके जनावरांच्या गोठ्यात ठेवणे कटाक्षाने टाळावे, जेणेकरून जनावरांना अपघाती विषबाधा होणार याकडे काळजी घेणे आवश्यक आहे.

५) शेतीसाठी लागणारी कीटकनाशके, बुरशीनाशके ही शेती, जनावरांचा गोठा किंवा परिसरात फेकून देऊ नयेत. ती सुरक्षित ठिकाणी जतन करून ठेवावीत. जेणेकरून जनावरांच्या खाण्यामध्ये अजाणतेपणे जनावरांनी कीटकनाशके बुरशीनाशके खाऊ नयेत याकडे लक्ष द्यावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button