VIP Darshan| पंढरपुरात व्हीआयपी दर्शनावर बंदी! आता भाविकांना 4 ते 5 तासात दर्शन
VIP Darshan| पंढरपूर: आषाढीच्या काळात पंढरपुरात भाविकांना होणाऱ्या त्रासाला आळा (prevent) घालण्यासाठी मंदिर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. आजपासून पुढील 10 दिवसांसाठी व्हीआयपी दर्शनावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला असून, आता त्यांना केवळ 4 ते 5 तासातच विठ्ठलाचे दर्शन घेता येणार आहे.
काल, मंगळवारी, पंढरपुरात दर्शन रांगेत मोठी गर्दी झाली होती. हजारो भाविक रांगेत तासन्तास उभे होते. यात व्हीआयपी भाविकांनीही घुसखोरी करून झटपट दर्शनाचा प्रयत्न केल्याने, सर्वसामान्य भाविकांना रात्रभर रांगेत उभे राहूनही दर्शन मिळू शकले नाही. यामुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती आणि त्यांनी मुख्यमंत्री आणि मंदिर प्रशासनाकडे तक्रार केली होती.
वाचा:Rain| खामगाव आणि बुलढाण्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती, अनेक गावांचा संपर्क तुटला, बाप-लेक पुरात अडकले, वाहतूक बंद!
या तक्रारींची दखल घेऊन मंदिर प्रशासनाने त्वरित कारवाई (action) कली आणि आजपासून व्हीआयपी दर्शनावर बंदी घातली. यामुळे आज दर्शन रांग लवकर सटली आणि भाविकांना 4 ते 5 तासातच विठ्ठलाचे दर्शन घेता आले. भाविकांमध्ये या निर्णयाचे स्वागत केले जात आहे आणि आता सर्वांना समान दर्शन मिळणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले की, आषाढीच्या काळात भाविकांना त्रास होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. व्हीआयपी भाविकांनीही दर्शन रांगेतूनच दर्शन घ्यावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, मुख्यमंत्र्यांनी आमदार, खासदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना आषाढीच्या काळात (During the) चिट्ठ्या, पत्रे देऊन किंवा फोन करून दबाव टाकण्यापासून रोखण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे व्हीआयपी दर्शनावर बंदी अधिक प्रभावीपणे राबवता येईल अशी अपेक्षा आहे.