ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

पीएम किसान योजनेच्या समस्या सोडवण्यात अधिकारी असमर्थ; अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना टोलवाटोलवीची उत्तरे..


पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (Prime Minister’s Farmers Honors Fund) संबंधीच्या अडचणींना खान्देशात दुर्लक्ष करीत असताना शेतकऱ्यांच्या लक्षात आले आहे. शेतकऱ्यांच्या समस्या कृषी व महसूल विभाग (Department of Agriculture and Revenue) सोडवते. पण आता हे विभाग सरळ फेकाफेकी करत असल्याचे दिसत आहे. शेतकरी सन्मान निधीसंबंधीतील कामे आमच्याकडे नाहीत असे म्हणत महसूल विभाग सरळ कृषी विभागाकडे (Department of Agriculture) पाठवत आहे. तर कृषी विभाग (Department of Agriculture) फेकफेकीची कारणे देऊन शेतकऱ्यांना माघारी पाठवत असल्याचे समोर आले आहे

.वाचा


शेतकरी जळगावच्या तहसील कार्यालयात पीएम किसानसंबंधीच्या अडचणी घेऊन गेले असताना. तेथील महसूल विभागाने कृषी विभागात (Department of Agriculture) जायला सांगितले. तेथील कर्मचाऱ्यांनी हे काम आमचे नाही वरिष्ठांनी आम्हाला करायला सांगितले नाही असे बोलून शेतकऱ्यांना माघारी पाठवले आहे. कृषी विभागात (Department of Agriculture) गेले असताना कृषी अधिकाऱ्याने आमच्याकडे पोर्टलवर दुरुस्तीसाठी आवश्यक आयडी-पासवर्ड (ID-password) नाहीत, असे सांगून याबाबत काम करण्यास असमर्थता दाखविली. तसेच तहसील कार्यालयात जावून चौकशी करा असेही सांगितले. कृषी विभाग महसूल विभागाकडे पाठवत आहे तर महसूल विभाग कृषी विभागाकडे. ही टोलवाटोलवी महिनाभर चालू असल्याने आता शेतकरी अक्षरशः कंटाळला आहे.


वाचा –


शेतकऱ्यांच्या (farmers) समस्या सोडविण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधीदेखील पुढे येत नाहीत. ही मोठी शोकांतिका आहे. जबाबदारी पाळायचीच नाही तर ही योजनाच बंद करा. प्रशासनाची कामे पाहून या घोषणा सरकारने दिल्या आहेत

.हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button