कृषी बातम्या
ट्रेंडिंग

PM Kisan चे 2000 रुपये मिळाले नाहीय? ‘या’ क्रमांकांवर नोंदवा तक्रार

PM Kisan's Rs 2,000 not received? Report to 'these' numbers

नवी दिल्ली: पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा नववा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आला आहे. सोमवारी ही रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आली. मात्र अद्यापही असे काही शेतकरी आहेत, ज्यांना ही मदत मिळाली नाही आहे. अशावेळी आता चिंता करण्याचे कारण नाही. या योजनेचे लाभार्थी असणाऱ्या करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा झाले आहेत. तुम्ही जर त्या शेतकऱ्यांपैकी असाल, ज्यांना अद्याप मदत मिळालेली नाही, त्यांनी चिंता करण्याचं कोणतंही कारण नाही. सरकारने काही हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत त्यावर संपर्क करून तुम्ही तक्रार दाखल करून शकता.

तसेच तुम्ही लेखापाल किंवा कृषी विभागाच्या संपर्क करू शकता. या कारणामुळे अडकतात पैसे अनेकदा सरकारकडून पैसे पाठवले जातात. मात्र काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे पोहोचत नाहीत. यामध्ये काही तांत्रिक कारणं देखील असतात. तर अनेकदा शेतकऱ्यांनी प्रविष्ट केलेला आधार क्रमांक आणि खाते क्रमांक यामध्ये गोंधळ असल्यास ते पैसे लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत.

2000 रुपये मिळवण्यासाठी इथे करा तक्रार या योजनेसंदर्भात तक्रार करण्यासाठी तुम्ही लेखापाल किंवा कृषी विभागाच्या संपर्क करू शकता आणि त्यांना सविस्तर माहिती देऊ शकता. तिथे तुमचं काम न झाल्यास या योजनेकरता सरकारने काही हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत त्यावर संपर्क करून तुम्ही तक्रार करू शकता. या क्रमांकावर करा संपर्क पीएम शेतकरी सन्मान टोल फ्री नंबर असणाऱ्या हेल्पलाइन नंबर 011-24300606 / 011-23381092 यावर संपर्क करू शकता. याशिवाय सोमवार ते शुक्रवारपर्यंत पीएम-किसान हेल्प डेस्कचा ई-मेल [email protected] यावर देखील संपर्क करू शकता.

पीएम शेतकरी सन्मान निधी योजना देशातील गरीब शेतकऱ्यांना बी-बियाणं, खतं खरेदी करण्याकरता निधी मिळावा याकरता राबवली जाते. मोदी सरकार कडून पीएम शेतकरी सन्मान निधी या योजनेअंतर्गतदेशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6000 रुपये तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात. 2000 रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांना पाठवले जातात.

संवाददाता- कविता ठाकरे

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button