ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

PM Kisan Yojana | शेतकऱ्यांच्या घराला नववर्षात लक्ष्मीचा हास्य! पंतप्रधान किसान योजनेचा धमाका पंतप्रधान किसान योजनेचा 16 हफ्ता..

PM Kisan Yojana | Lakshmi's smile in the New Year to the farmer's house! Blast of Pradhan Mantri Kisan Yojana 16 weeks of Pradhan Mantri Kisan Yojana..

PM Kisan Yojana | नव्या वर्षात शेतकऱ्यांना मोदी सरकारकडून भेट मिळणार आहे. नववर्षात शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान योजनेचा 16 वा हफ्ता जमा होणार आहे.

नोव्हेंबर महिन्यात (PM Kisan Yojana) पंतप्रधान किसान योजनेचा 15 वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला. 15 नोव्हेंबर रोजी देशभरातील 8 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18,000 कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला होता. त्यानंतर आता शेतकऱ्यांना PM किसान योजनेच्या 16 व्या हफ्त्याची प्रतीक्षा आहे.

नववर्षात सरकारची शेतकऱ्यांना भेट

केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी आहे. या योजनेत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी प्रत्येकी 2000 रुपयांचे हप्ते दिले जातात. या योजनेतील लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून वार्षिक एकूण 6000 रुपयांची आर्थिक मदत मिळते. नवीन वर्ष 2024 मध्ये, शेतकऱ्यांना 16 व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. 16 वा हफ्ता खात्यावर केव्हा जमा होईल याची तारीख जाणून घ्यायची आहे. पीएम किसान योजनेचा 16 वा हफ्ता कधी शेतकऱ्यांच्या खात्त्यात केव्हा जमा होऊ शकतो हे जाणून घ्या.

वाचा : Rent Farm Land | शेती महामंडळाकडून शेतजमीन भाड्याने कशी घ्यावी?

खात्यात 16 वा हप्ता कधी जमा होणार?

पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना आतापर्यंत 15 हप्ते पैसे मिळाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 नोव्हेंबर 2023 रोजी 15 वा हप्ता जारी करून 8 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना लाभ दिला होता. आता शेतकरी 16 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. मात्र, हप्त्याच्या तारखेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हफ्ता फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये जमा केला जाऊ शकतो.

फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये जमा होण्याची शक्यता

मागील वर्षी, पंतप्रधान किसान योजनेचा 15 वा हप्ता नोव्हेंबर महिन्यात जमा करण्यात आला होता. त्यानंतर, 16 वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात जमा करण्यात आला होता. त्यामुळे, या वर्षी देखील पंतप्रधान किसान योजनेचा 16 वा हप्ता फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांसाठी ही खूप चांगली बातमी आहे. नववर्षात शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे. या मदतीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेती व्यवसायात मदत होणार आहे.

Web Title : PM Kisan Yojana | Lakshmi’s smile in the New Year to the farmer’s house! Blast of Pradhan Mantri Kisan Yojana 16 weeks of Pradhan Mantri Kisan Yojana..

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button