ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

PM Kisan Yojana | काऊंटडाऊन सुरू! पीएम किसान आणि नमो शेतकरीचे दोन्ही हप्ते येणार शेतकऱ्यांच्या खात्यात; जाणून घ्या कधी?

PM Kisan Yojana | Countdown begins! Both the installments of PM Kisan and Namo Shetkari will be credited to the farmer's account; Know when?

PM Kisan Yojana | केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याचा लाभ ८७ लाख ९६ हजार शेतकऱ्यांना (PM Kisan Yojana) मिळणार आहे. या हप्त्यात शेतकऱ्यांच्या खात्यात १९४३ कोटी ४६ लाख रुपये जमा केले जातील. याचबरोबर, राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा (Namo Shetkari Yojana) दुसरा आणि तिसरा हप्ताही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. या हप्त्यात ४ हजार रुपये प्रमाणे ३७९२ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील.

२८ फेब्रुवारी रोजी यवतमाळ जिल्ह्यातील भारी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका विशेष समारंभात या हप्त्याचे वितरण होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाजावाजा करत तीन हप्ते एकत्र देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाची तयारी थेट पंतप्रधान कार्यालयातून करण्यात आली आहे. केंद्रीय कृषी विभाग आणि राज्य सरकारने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्यात ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. पंधराव्या हप्त्याच्या तुलनेत २ लाख ३३ हजार शेतकऱ्यांची भर पडली आहे. या शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे. मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी महासन्मान निधीची घोषणा केली होती.

वाचा | Artificial Intelligence In Agriculture | कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचे काय आहे योगदान वाचा सविस्तर …

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षातून ६ हजार रुपये दिले जातात. हे पैसे ३ हप्त्यांत २ हजार रुपये असे दिले जातात. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गतही शेतकऱ्यांना वर्षातून ६ हजार रुपये दिले जातात.

२८ फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण देशभर पीएम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी कृषी विभागाच्या जिल्हा, तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांना हा दिवस पीएम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. या दिवसाचं जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर साजरा केला जाणार आहे. कृषी विज्ञान केंद्र आणि सामाईक सुविधा केंद्र येथेही पीएम किसान उत्सव दिवस साजरा केला जाणार आहे.

Web Title | PM Kisan Yojana | Countdown begins! Both the installments of PM Kisan and Namo Shetkari will be credited to the farmer’s account; Know when?

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button