ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

PM Kisan Yojana | पीएम किसान योजनेतून पैसे मिळत नाहीत? गावातच मिळवा सर्वतोमुखी मदत! राज्य सरकारची शेतकऱ्यांसाठी ‘संपृक्तता मोहीम’

PM Kisan Yojana | Not getting money from PM Kisan Yojana? Get comprehensive help in the village! State Government's 'Enrichment Campaign' for Farmers

PM Kisan Yojana | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ सर्व पात्र शेतकऱ्यांना मिळावा यासाठी राज्य सरकारकडून मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचे उद्दिष्ट (PM Kisan Yojana) पीएम किसान योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण करणे आणि लाभांचे वितरण सुलभ करणे हे आहे.

या मोहिमेचे कामकाज दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील पीएम किसान योजनेतील असे लाभार्थी निवडले जातील ज्यांचे बँक खाते आधारशी संलग्न नाही, ईकेवायसी प्रलंबित आहे, स्वयंनोंदणी लाभार्थीची मान्यता प्रलंबित आहे किंवा स्टॉप पेमेंट केलेले आहे. या लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण करण्यासाठी पोस्ट खाते, सामाईक सुविधा केंद्र आणि बँक व्यवस्थापन यांचा प्रभावीपणे वापर केला जाईल.

वाचा : Farmers Day: Shinde Sarkar च्या कार्यकाळात शेतकऱ्यांना मिळाली 44 हजार कोटींची मदत; काय केली तरतूद?

दुसऱ्या टप्प्यात ७ जानेवारी २०२४ पर्यंत जिल्ह्यात भूमी अभिलेख नोंदी प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची नोंद पूर्ण केली जाईल. तसेच, गावातील नवीन पात्र लाभार्थ्यांचा शोध घेऊन त्यांची पीएम किसान योजनेमध्ये नोंदणी केली जाईल. त्यानंतर गाव, तालुका, जिल्ह्यामध्ये कोणतेही पात्र कुटुंब पीएम किसान योजनेत समाविष्ट करण्याचे राहिले नसल्याचे प्रमाणपत्र कृषी आयुक्तालयास सादर केले जाईल.

या मोहिमेसाठी कृषी विभागाने गावस्तरीय नोडल अधिकारी नेमले आहेत. हे नोडल अधिकारी गावातील पात्र शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करण्यासाठी काम करतील. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

Web Title | PM Kisan Yojana | Not getting money from PM Kisan Yojana? Get comprehensive help in the village! State Government’s ‘Enrichment Campaign’ for Farmers

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button