PM Kisan Yojana | पीएम किसानच्या बदलल्या अटी! राज्यातील थेट 22.40 लाख शेतकऱ्यांचा पत्ता कट; यादीत तुमचं तर नावं नाही ना?
Changed terms of PM Kisan! Direct cut address of 22.40 lakh farmers in the state; Your name is not in the list?
PM Kisan Yojana | केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील लाभार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. राज्यात चार वर्षांच्या कालावधीत 22.40 लाख शेतकरी या योजनेच्या यादीतून वगळण्यात आले आहेत. 2020-21 मध्ये महाराष्ट्रात पीएम किसान योजनेचे 1.08 कोटी लाभार्थी होते. त्यांची संख्या 2022-23 मध्ये 1.04 कोटी आणि 2023-24 मध्ये जुलै महिन्यापर्यंत 85.40 लाखांवर आली आहे. यामुळे लाभार्थ्यांची संख्या 22.40 लाखांनी कमी झाली आहे.
योजनेच्या अटींमध्ये बदल
योजनेच्या अटींमध्ये बदल झाल्याने हे घडले आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये तीन समान हप्त्यांमध्ये दिले जातात. मात्र, योजनेच्या अटींमध्ये बदल करून आता लाभार्थ्यांना आधार कार्ड, बँक खाते आणि जमिनीच्या मालकीचे पुरावे सादर करावे लागतात. यामुळे अनेक शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले नाहीत.
वाचा : Subsidy | शेततळे व सूक्ष्म सिंचन अनुदानासाठी 126 कोटींच्या निधीस मान्यता, ‘अशी’ होणारं लाभार्थ्यांची निवड
अपात्र लाभार्थी
या योजनेचे महाराष्ट्रात सर्वाधिक लाभार्थी अहमदनगर जिल्ह्यात आहेत. अहमदनगर जिल्ह्यात 5.17 लाख शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. त्यानंतर सोलापूर (4.54 लाख), कोल्हापूर (4.06 लाख), बीड आणि पुणे (3.89 लाख), नागपूर (1.50 लाख), नाशिक (3.85 लाख), छत्रपती संभाजीनगर (3.26 लाख) आणि यवतमाळ (2.77 लाख) हे जिल्ह्यांचा समावेश आहे. या योजनेमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते. मात्र, योजनेच्या अटींमुळे अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहत आहेत.
हेही वाचा :
Web Title: Changed terms of PM Kisan! Direct cut address of 22.40 lakh farmers in the state; Your name is not in the list?