योजना

PM किसान ट्रॅक्टर योजना : ट्रॅक्टर खरेदी करायचा आहे तर मिळेल 50 टक्के पर्यंत सबसिडी! वाचा कसा फायदा मिळेल तुम्हाला…

PM Kisan Tractor Scheme: If you want to buy a tractor, you will get up to 50 percent subsidy! Read how you benefit

आलीकडच्या काळामध्ये शेतीमध्ये आधुनिक तंत्राचा उपयोग केला जातो, तंत्राच्या (Of technique) सहाय्याने शेती केल्यास मनुष्यबळ (Manpower) कमी प्रमाणात लागते त्याचप्रमाणे पैशांमध्ये बचत होते, तसेच वेळही वाचतो. शेतीसाठी सर्वात महत्वाचा घटक म्हणजे ट्रॅक्‍टर (Tractor) होईल, ट्रॅक्टर ने अनेक शेतामधील कामे सोपी होतात, परंतु प्रत्येक वेळेस ट्रॅक्टर घेणे शक्य होत नाही.

प्रत्येक शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेता यावा यासाठी केंद्र सरकारने पीएम किसान ट्रॅक्टर योजना (PM Kisan Tractor Scheme) सुरू केली आहे. या योजनेद्वारे तुम्हाला पन्नास टक्‍क्‍यांपर्यंत सबसिडी (Subsidy) मिळू शकते, चला तर या योजनेद्वारे तुम्हाला कसा फायदा घेता येईल हे पुढील प्रमाणे पाहू :

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! शेतकऱ्यांना मिळणार 90 टक्के अनुदानवर शेती उपयोगी अवजारे…

पी एम किसान ट्रॅक्टर योजनेअंतर्गत शेतकरी कोणत्याही कंपनीचे ट्रॅक्टर घेऊ शकतात, व केंद्र सरकार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेण्यासाठी मदत करते, शेतकऱ्यांना फक्त अर्धी किंमत भरावी लागते व उर्वरित रक्कम केंद्र सरकार (Central Government) भरत असते. अनेक राज्य सरकार आपापल्या स्तरावर शेतकऱ्यांना ट्रॅक्टरवर 20 ते 50 टक्के अनुदान देते.

कुक्कुटपालन अनुदान : ‘कुक्कुटपालन’ करण्यासाठी ‘या’ योजनेतून मिळणार 5.25 लाख रुपयांचे अनुदान!

शेतकऱ्यांना कसा फायदा देता येणार?
पीएम किसन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केवळ 1 ट्रॅक्टर खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना शासन अनुदान (Grants) देते. या योजनेचे लाभार्थी होण्याकरता पुढील कागदपत्राची आवश्यकता आहे.

  • आधार कार्ड
  • जमीन कागदपत्रे
  • बँकेचा तपशील
  • पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक असेल.

पी एम किसान योजनेअंतर्गत 50 टक्के सबसिडी मिळण्यासाठी, शेतकरी जवळच्या कोणत्याही सीएससी ( CSC) केंद्राला भेट देऊन ऑनलाईन (Online) अर्ज करावा लागतो.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

1. शेती व तंत्रज्ञान: शेतीसाठी आले आहे, “फोर इन वन यंत्र” पहा काय आहेत याची वैशिष्ट्ये..!

2. PM Kisan Samman Nidhi Scheme: पीएम किसान सन्मान योजनेमध्ये अपात्र व्यक्तींना बसणार का केंद्राचा दणका ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button