ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

PM Kisan | PM किसानचा 15वा हप्ता मिळण्यासाठी शेतकऱ्यांनो तत्काळ करावी ‘ही’ कामे, अन्यथा रहाल वंचित

PM Kisan | To get the 15th installment of PM Kisan, the farmers should do 'these' works immediately, otherwise they will remain deprived

PM Kisan | पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता 27 जुलै 2023 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. आता शेतकऱ्यांना 15 व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. पण 15 वा हप्ता मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी काही कामे करणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांना 15 व्या हप्त्यापासून वंचित राहावे लागू शकते. चला तर मग 15 व्या पूर्वी शेतकऱ्यांनो कोणती कामे करणे गरजेचे आहे हे जाणून घेऊयात.

eKYC करणे आवश्यक आहे
जर तुम्ही पीएम किसान योजनेअंतर्गत लाभार्थी असाल आणि अद्याप ई-केवायसी केली नसेल, तर तुम्ही 15 व्या हप्त्यापासून वंचित राहू शकता. अशा स्थितीत तुम्ही लवकरात लवकर eKYC करुन घेणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या वेबसाइटवर जावं लागेल किंवा तुम्ही सीएससी केंद्रावर जाऊनही ते करून घेऊ शकता.

जमिनीच्या नोंदींची पडताळणी करणे आवश्यक आहे
शेतकऱ्यांना 15 व्या हप्त्यासाठी पात्र ठरवण्यासाठी त्यांच्या जमिनीच्या नोंदींची पडताळणी केली जाते. जर तुमच्या जमिनीच्या नोंदींमध्ये काही चूक असेल, तर तुम्ही 15 व्या हप्त्यापासून वंचित राहू शकता. त्यामुळे तुमच्या जमिनीच्या नोंदींची पडताळणी करून घ्यावी.

वाचा : Pan Card Update | पॅन कार्डामध्ये काही चूक असल्यास चुटकीसरशी करा मोबाईलवरून दुरुस्त; जाणून घ्या प्रक्रिया

अर्जात कोणतीही चूक नसल्याची खात्री करा
तुम्ही पीएम किसान योजनेसाठी अर्ज करताना तुम्ही भरलेल्या अर्जात कोणतीही चूक नसल्याची खात्री करा. त्यामध्ये लिंग, नाव, पत्ता आणि खाते क्रमांक यामध्ये कोणतीही चूक असल्यास योजनेचा हप्ता थांबवला जाऊ शकतो.

शेतकऱ्यांनी कराव्यात ही कामे

  • तुमची eKYC करून घेणे गरजेचे आहे.
  • जमिनीच्या नोंदींची पडताळणी करा.
  • अर्जात कोणतीही चूक नसल्याची खात्री करा.
  • या सर्व गोष्टी केल्यास तुम्हाला PM किसानचा 15 वा हप्ता मिळेल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title : PM Kisan | To get the 15th installment of PM Kisan, the farmers should do ‘these’ works immediately, otherwise they will remain deprived

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button