PM Kisan | डिसेंबर महिना अर्धा संपला आहे. शेतकरी पुढच्या हप्त्याची म्हणजे 13 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पीएम किसान योजना (PM kisan Yojana) म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना केंद्राच्या मोदी सरकारद्वारे शेतकर्यांच्या (Agriculture) फायद्यासाठी चालवली जाते. ज्या अंतर्गत मोदी सरकार शेतकर्यांना 6 हजारांची (Financial) आर्थिक मदत देते. शासनाकडून प्रत्येकी दोन हजारांच्या तीन हप्त्यांमध्ये ही मदत शेतकऱ्यांच्या (Department of Agriculture) खात्यावर जमा केली जाते.
वाचा:राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय! शासनचं एका झटक्यात मिटवणार 50 वर्षांचा भाऊबंदकीच्या जमिनीचा वाद
पीएम किसान योजना
आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 12 हप्ते जमा करण्याचे काम केंद्रातील मोदी सरकारने केले आहे. शेतकरी आता पीएम किसान (PM Kisan Yojana) योजनेच्या 13व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये पाठवले जातात.
केंद्रातील मोदी सरकारकडून दर चार महिन्यांनी 2-2 हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये हा पैसा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. 12 हप्ते जाहीर झाल्यानंतर आता शेतकरी 13व्या हप्त्याची वाट पाहत आहेत, त्यापूर्वी त्यांनी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही चुका टाळण्याची गरज आहे ज्यामुळे त्यांचे पैसे अडकू शकतात. या कोणत्या चुका आहेत त्या जाणून घेऊया.
गाय-म्हशी, शेळी-मेंढी आणि कुक्कट पालनासाठी ‘या’ योजनेतंर्गत 75 टक्के अनुदानावर अर्ज सुरू, जाणून घ्या अंतिम तारीख
केवायसी आवश्यक
जर तुम्हाला 13व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात यायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला ई-केवायसी करणे आवश्यक आहे. जर तुम्ही हे पूर्ण केले नाही तर तुमचे हप्त्याचे पैसे अडकू शकतात. त्याच वेळी, तुम्ही पीएम किसानच्या अधिकृत पोर्टल pmkisan.gov.in वरून किंवा तुमच्या जवळच्या CSC केंद्राला भेट देऊन ई-केवायसी करू शकता.
तुम्हाला हप्त्याचा लाभ मिळत राहायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला जमीन पडताळणी करणे आवश्यक आहे. पीएम किसान योजनेच्या प्रत्येक लाभार्थ्याने हे सरकारकडून करून घेणे आवश्यक आहे.
वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! बाजारात घटली कापसाची आवक; विक्रीची घाई करू नका, दरात होणार मोठी वाढ
पीएम किसानचा 13 वा हप्ता तुमच्या खात्यात कधी येईल?
मोदी सरकारने आतापर्यंत 12 हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या बँक (Bank Loan) खात्यात जमा केले आहेत. अशा परिस्थितीत लाभार्थी आता 13व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डिसेंबरच्या अखेरीस सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात 13 वा हप्ता जमा करू शकते.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- नाद करायचा पण उडदाचा नाय बरका! मिळतोय सर्वाधिक दर, जाणून घ्या इतर शेतमालाच्या दराची स्थिती काय?
- पशुपालकांसाठी खुशखबर! दुधाचा व्यापारही वाढणार अन् जनावरांच्या रोगाचा खर्चही संपणार, कसं ते जाणून घ्या…
Web Title: Breaking news! 13th installment of PM Kisan will be deposited in the account on day, check immediately will you get it?