योजना

PM Kisan |शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला 17 वा हफ्ता! PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ 9.26 कोटी शेतकऱ्यांना

PM Kisan |नवी दिल्ली, 18 जून: देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आज 18 जून रोजी, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi Scheme) योजनेअंतर्गत 17 वा हफ्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे. या योजनेचा लाभ देशातील 9.26 कोटी शेतकऱ्यांना मिळणार आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी केली होती घोषणा

लोकसभा निवडणुकीनंतर तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर, नरेंद्र मोदी यांनी PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीला मंजुरी दिली होती. 18 जून रोजी शेतकऱ्यांना ही मदत मिळेल, असे जाहीर करण्यात आले होते.

वाचा:Ashadhi Wari 2024 | आषाढी वारीसाठी दिंडींना 20 हजार रुपयांचे अनुदान

मान्सूनच्या आगमनाने शेतकऱ्यांना मदत

सध्या देशातील अनेक भागात मान्सूनचे आगमन झाले आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे. खते, औषध फवारणी यासाठी शेतकरी पैशांची तजवीज करत आहेत. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या बँख खात्यात आता दोन हजार रुपये येणार आहेत. त्यामुळे या पैशांची शेतकऱ्यांना खूप मदत होणार आहे.

ई-केवायसी न केल्यास शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अगोदर आपली ई-केवायसी (e-KYC) करणे गरजेचे आहे. ई-केवायसी पूर्ण केलेली नसेल तर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि त्यांना 2000 रुपये मिळणार नाहीत.

घरी बसूनच करता येईल ई-केवायसी

फेस ऑथेंटिकेशन (Face Authentication) च्या मदतीने तुम्ही घरी बसूनच ई-केवायसी करू शकता. तसेच देशभरातील कॉमन सर्व्हिस सेंटरवरदेखील तुम्ही ई-केवायसी करू शकता. ज्या शेतकऱ्यांनी याआधीच ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, त्यांना आता पुन्हा एकदा केवायसी करण्याची गरज नाही.

ई-केवायसी कशी करावी?

  1. ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाइलवर PM Kisan अॅप डाऊनलोड करावे लागेल.
  2. अॅप Install झाल्यानंतर मोबाईल क्रमांकाच्या मदतीने लॉग इन करा.
  3. मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल. तो अॅपमध्ये टाका.
  4. पुढे दिलेल्या सूचनांप्रमाणे प्रक्रिया पार पाडल्यावर तुमचे ई-केवायसी पूर्ण होईल.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. PM किसान सन्मान निधी योजना यातीलच एक आहे. या योजनेमुळे देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button