कृषी तंत्रज्ञान

सफेद चंदनाची लागवड करा आणि मिळवा दीड कोटी रुपये…

Plant white sandalwood and get Rs 1.5 crore

अलीकडील काळामध्ये शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान (Modern technology) तसेच वेगवेगळ्या मार्गाने शेती केली जाते, पारंपरिक शेतीला आळा घालत नवीन शेती संलग्न व्यवसाय केले जातात. सफेत चंदन (White sandalwood) पिकाची लागवड केल्यास, कमी खर्चा मध्ये तुम्हाला अधिक नफा प्राप्त होऊ शकतो यासाठी तुम्हाला कमीत कमी अडीच लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास दीड कोटी रुपयापर्यंतचा फायदा मिळू शकतो.

राज्य सरकार (State Government) देखील चंदनाची शेती करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे, त्याकरिता योजना देखील राबवत आहेत. सध्या भारतात सफेद चंदनाचा सर्वसाधारण दर आठ हजार ते दहा हजार प्रति किलो इतका आहे. आंतरराष्ट्रीय (International) स्तरावर 20 हजार ते 25 हजार इतका आहे.

चंदनाची शेती करण्याकरिता प्रथम तज्ञ व्यक्तींकडून तुम्ही माहिती गोळा करा, तसेच चंदनाची शेती पासून मिळणारे उत्पन्न त्वरित नसते त्यासाठी सर्व साधारणपणे दहा ते बारा वर्ष प्रतीक्षा करावी लागते. चंदनाच्या एका रोपाची सर्वसाधारण किंमत चारशे रुपये इतके आहे.

वाचा : भारतातील ‘या’ झाडाची किंमत आहे सोन्यापेक्षाही महाग, वाचा तुम्हाला कशी मिळेल सुवर्णसंधी..

चंदनाचे शेतीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला पाण्याची गरज नाही किंवा त्याच्यासाठी लागणारा खर्च देखील कमी असतो. कोरडवाहू शेती (Dryland farming) देखील आपण चंदनाची शेती करू शकता.

चंदनाचा उपयोग परफ्युम (Sandalwood used perfume) तयार करणे, सुगंधित साबण (Soap) निर्मितीसाठी, तसेच विविध सौंदर्यप्रसाधने यापासून तयार केली जाते. धार्मिक कार्यक्रमात(At a religious event) देखील चंदनाच्या मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो.

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button