कृषी सल्ला

या औषधी वनस्पतीची लागवड करा आणि मिळावा भरघोस उत्पन्न,खर्चापेक्षा तीन पट जास्त अधिक फायदा…

Plant this herb and get a good income, three times more than the cost.

ब्राह्मी ही एक औषध वनस्पती आहे. कर्करोग, अशक्तपणा, दमा, मूत्रपिंड आणि मिर्गी यासारख्या आजारांच्या उपचारांमध्ये वापरली जातात. तसेच साप चावल्यानंतर या वनस्पतीचे उपयोग केला जातो उपयोग केला जातो. या वनस्पतीचे मूळ नाव “बाकोपा मॉनिअरी” आहे. या वनस्पतीची शेती केल्यास शेतकऱ्यांना अधिक फायदा होतो या वनस्पतीची लागवड खूप कमी प्रमाणात होती त्यामुळे त्याला मागणी अधिक असते परिणामी त्याला बाजार भाव पण चांगला मिळतो.

ही वनस्पती जमिनीवर पसरत जाते व त्याला पांढऱ्या रंगाची फुले देखील येतात तसेच याच्या प्रजाती देखील आहे.

🌼ब्राह्म चे गुणधर्म:🌼

१)ब्राह्मीमध्ये रक्त शुद्धतेचे गुणधर्म आहेत.

२) ब्राह्मी बुद्धीला चालना देते .

३)स्मरणशक्ती वाढविण्यात देखील मदत करते.

४) यापासून बनविलेली औषधे कर्करोग, अशक्तपणा, दमा, मूत्रपिंड आणि मिर्गी.

५)साप चावल्यानंतर अत्यंत गुणकारी असते.

🌼ब्राह्मी लागवडीसाठी वातावरण🌼

ब्राह्मी वनस्पती तलाव, नद्या, कालवे आणि जलीय स्त्रोतांच्या काठावर म्हणजे उत्तम पाण्याचा स्त्रोत जेथे आहे तेथे ब्राह्मणी उत्तम येते,भारतात सर्व राज्यांत त्याची लागवड केली जाते.

जमिनीचे पीएच मूल्य 5 ते 7 दरम्यान असावे. ब्राह्मीच्या लागवडीसाठी माती ठिसूळ आणि सपाट असणे आवश्यक आहे..

🌱लागवड पद्धत

,🌱ब्राह्मी लागवडीसाठी प्रथम रोपे तयार करावी लागतात. प्रथम शेतामध्ये बीया पेरून वनस्पती तयार झाल्यावर त्याची लागवड केली जाते.

🌱 प्रथम शेत चांगले नांगरून त्यामध्ये सेंद्रिय खताचा वापर करावा. त्यानंतर बांध तयार करून 20 ते 25 सेंटिमीटर अंतरावर रोपे लावली जातात. पावसाळ्याच्या दरम्यान ही शेती केल्यास अत्यंत उपयुक्त ठरते.

🌱महिन्यातून दोन वेळा म्हणजेच पंधरा दिवसाला खुरपणी करणे अत्यंत गरजेचे आहे. खुरपणी न केल्यास वनस्पती वाढीवर त्याचा परिणाम होतो.

🌱लागवडीनंतर चार महिने काढण्यासाठी तयार होते. तसेच ब्राह्म चे उत्पादन वर्षातून तीन चार वेळा होऊ शकते. वनस्पतीच्या खोडापासून तीन ते चार सेंटीमीटर अंतर वर ही वनस्पती कापले जाते,कापल्यानंतर त्याला पुन्हा फाटे फुटतात. अधिक उत्पन्न मिळण्यासाठी सुकलेल्या पानांची भुकटी करून विकल्यास अधिक फायदा मिळतो.

👩‍💻हेही वाचा

)या ॲप्लिकेशन वापर केल्यामुळे शेतकऱ्यांना मिळेल पाऊस अगोदर सुचना आणि कृषी सल्ला… पहा कोणते हे ॲप्लिकेश

२) या वनस्पतीची लागवड आणि मिळवा भरघोस उत्पन्न..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button