कृषी बातम्या

‘ या’ फळझाडाची लागवड करा आणि मिळवा “कमी पाण्यात व कमी खर्चात भरपूर नफा”,जाणून घ्या लागवड प्रक्रिया…

Plant this fruit tree and get "Lots of Profit in Less Water and Less Cost", Learn Planting Process लाग

कोरड्या उष्ण हवामानामध्ये तसेच पपईला पाणीपुरवठा योग्य मिळाल्यास पपईची वाढ जोमाने होते. पपई हे कमी पाण्यामध्ये भरपूर नफा मिळवून देणारे फळ आहे पपई फळांमध्ये अ जीवनसत्व चे प्रमाण अधिक असते त्याच बरोबर क जीवनसत्व सुद्धा असते.

पपई ही आरोग्य दृष्ट्या अतिशय गुणकारी आहे बद्धकोष्टता, अपचन, मुळव्याध, विकारावर फायदेशीर ठरते .पपई पासून अनेक पदार्थ देखील बनवले जातात टूटी फ्रुटी, पपई प्युरी, पपई पावडर, बेबी फूड्स ई प्रक्रियायुक्त पदार्थ बनवले जातात.

पपई लागवडीकरिता मध्यम काळ्या जमिनीची आवश्यकता असते, मोकळी पाण्याचा निचरा चांगला होणारी तसेच जैव पदार्थांचा भरपूर पुरवठा असलेली जमीन पपईसाठी फायदेशीर ठरते. पाण्याचा योग्य निचरा न झाल्यास पपईचे खोड व बुंधे किडीमुळे कुजून जातात त्याकरिता पाणी निचरा होणे आवश्यक आहे.

चला तर मग पाहूया या गुणकारी पपईची लागवड कशा प्रकारे करावे.

📌 पपई लागवडीकरिता प्रथम पपईच्या बियांपासून रोपे तयार केली जातात सर्वसाधारणपणे एक हेक्‍टरसाठी 300 ग्रॅम ते 350 बियाण्यांपासून रोपवाटिका तयार करावी लागते. पपईची लागवड करताना दिड ते दोन महिन्याची रोपे वापरावीत.

📌 जमिनीची आडवी उभी नांगरणी करावी. कुळवाने वखरपाळी देऊन व जमीन सपाट करून घ्यावी. पपईची लागवड करताना 2.25 x 2.25 मी. अंतरावर पपईची रोपे लावावीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button