फळ शेतीयोजना

“या” योजनेच्या माध्यमातून करा पेरू फळबागाची लागवड आणि मिळवा शास्वत उत्पन्न!

Plant Peruvian orchards through this scheme and get sustainable income!

अनेक शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, पारंपरिक शेती सोडून नवनवीन मार्ग काढून शेती करत आहेत, अनेक शेतकरी कृषी विभागाकडून,भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून फळबाग लागवड करत आहेत भरघोस उत्पादन होत आहेत.

या योजनेच्या माध्यमातून आपण पेरू फळबागा चे उत्पादन घेऊ शकतो, पेरू हे कमी पाण्यात येणारे फळ आहे, व कोणतेही जमिनीत येणारे फळ आहे य यातून शाश्‍वत उत्पादन देखील मिळते त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होतो. तसेच या पेरू फळबागेकरिता कमी मेहनत तसेच खर्च देखील कमी लागतो कमी प्रमाणात लागतो.

पेरूची लागवड पद्धत (Cultivation method of Peru)
पेरूच्या लागवड पध्दतीमध्ये दोन लागवड पध्दतीने लागवड करता येते. पहिली पध्दत म्हणजे 2 X 1 मीटर (6 X 3 फूट) अंतरावर लागवड व दुसरी पध्दत 7.5 X 7.5 फुट अंतरावर लागवड करणे. जर आपण 2 X 1 मीटर अंतरावर लागवड केली असेल तर आपल्याला वर्षातून तीन छाटण्या कराव्या लागतात यासाठी मजुरांची गरज जास्त लागते याचा विचार करता 7.5 X 7.5 फूट अंतरावर लागवड कमी खर्चिक आहे.

आंतर पीक (Inter-crop) पेरूच्या बागेमध्ये आंतरपीक म्हणून सोयाबीन पीक लावू शकतो. त्यामुळे सहाजिकच दुहेरी उत्पन्न फायदा मिळू शकतो.

या योजनेद्वारे करा फळबाग लागवड (Plant orchards through this scheme)

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेंतर्गत, त्याच प्रमाणे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व महात्मा गांधी रोजगार हमी योजना या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या फळबाग लागवडीकरिता अनुदान उपलब्ध होते. भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज देखील स्वीकारले जाऊ शकतात. या योजनेद्वारे पेरू, सीताफळ, लिंबू, आवळा यासारख्या फळबागेची लागवड आपण करू शकतो. या योजनेचा लाभ घेण्याकरिता, ठिबक सिंचन असणे आवश्यक आहे तसेच सरकार मान्य असणाऱ्या रोपवाटिकांमधून रुपे घेणे आवश्यक आहे.

लागणारे कागदपत्र (Documents required:)
अर्जासोबत सातबारा, आठ ‘अ’, बँक पासबुक झेराॕक्स, आधारकार्ड झेराॕक्स, हमीपत्र आदी कागदपत्र सादर करावे. फळबाग योजने संदर्भात माहिती घेण्यासाठी कृषी विभागातील अधिकारी म्हणजेच कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी अथवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा.

हेही वाचा:
१) बघा, “पिक कर्ज” मिळण्याची संपूर्ण प्रोसेस फक्त एका क्लिकवर…
२) शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची सूचना! “या” हमीभावाने गहू खरेदी होणार सुरू…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button