बांबूचे (Bamboo) शेतीमधून कमी खर्चात (At low cost) अधिक नफा प्राप्त करता येतो, केंद्र सरकार (Central Government) व राज्य सरकार (State Government) देखील बांबूची शेती (Bamboo farming) करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित (Encouraged) करते. त्याकरता शासनाने बांबू शेतीकरण्यासाठी सरकार अनुदानही देते. सरकारने अटल बांबू समुद्धी योजना (Atal Bamboo Samuddhi Yojana) लागू केली आहे.
हवामानाशी व वातावरणाशी (With the atmosphere) जुळवून घेणाऱ्या, जवळपास बांबूच्या चौदाशे (1400) जाती आहेत, बांबू गवत अत्यंत जलद गतीने वाढते (Grows fast) दिवसाला दोन ते तीन फूट व बांबू वाढतो. बांबूच्या शेतीसाठी कमी पाणी तसेच अतिशय कमी खताचा (Fertilizer) वापर केला जातो. तसेच बांबूचे पिकाची रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) चांगली असल्याने याला कीटकनाशक (Pesticides) देखील कमी प्रमाणात वापरली जातात.
महाराष्ट्रात (In Maharashtra) मानवेल, कटांग-काटस, कोंड्या मेस, पिवळा बांबू, चिवळीया प्रजातीचे बांबू आढळतात. बांबूची लागवड केल्यापासून सुमारे पाच वर्षांनंतर त्याचे उत्पन्न मिळायला लागते. त्यानंतर सुमारे साडेचार लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न (Income up to Rs 4.5 lakh ) प्रतिमहिना मिळू शकते.
बांबू औद्योगिक दृष्ट्या अत्यंत उपयुक्त आहे बांबू पासून हस्तकला, शेती, फर्निचर, खाद्य, बांधकाम, विविध वस्तू, वाद्यनिर्मिती, कागद उद्योग यांच्यासाठी बांबूचा उपयोग होतो. महाराष्ट्र बांबू विकास मंडळाकडून (From Maharashtra Bamboo Development Board) टिश्यू कल्चर (Tissue culture) बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाते.
बांबू लागवडीवर पोखरा नानाजी देशमुख संजीवनी (Pokhara Nanaji Deshmukh Sanjeevani) अंतर्गत 75 टक्के अनुदान (Grants) दिले जाते. हे अनुदान मिळवण्यासाठी तुम्हाला https://dbt.mahapocra.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन संपूर्ण माहिती भरावी लागेल. या योजनेंतर्गत तुम्हाला बांबू लागवडीकरता अनुदान प्रदान करण्यात येईल.
तसेच शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात बांबूची लागवड करण्याकरिता रोपे उपलब्ध व्हावी त्याकरता महाराष्ट्र बांबू विकास मंडळाने विहीत केलेल्या नमुन्यात खालील दस्तावेजासह अर्ज करावा.
(1) शेतीचा गाव नमूना ७/१२, गाव नमूना आठ, गाव नकाशाची प्रत.
(२) ग्राम पंचायत / नगरपरिषद / नगरपंचायत यांचेकडून रहिवासी असल्याबाबतचा दाखला.
(३) बांबू लागवड करावयाच्या शेतामध्ये बांबूचे अपेक्षित उत्पन्न मिळण्यासाठी ठिबक सिंचन व बांबू
रोपे लहान असतांना डूकरापासून रोपे सुरक्षित ठेवण्यासाठी संरक्षक कुंपणाची सोय
असल्याबाबतचे हमीपत्र.
(४) आधार कार्डची प्रत.
(५) बँक खात्याचा तपशील व पासबुकची प्रत/कोर्या धनादेशाची छायांकित प्रत.
(६) अर्जदार शोतकऱ्याने त्याचे बँकेचे खाते आधार क्रमांकाशी जोडून घेणे आवश्यक राहील आणि
त्याकरीता त्याने बँकेला दिलेल्या पत्राची व बँकेकडून मिळालेल्या पोहोच पावतीची प्रत.
(७) शेतामध्ये विहीर/शेततळे/बोअरवेल असल्याबाबतचे विहीत प्रपत्रात हमीपत्र.
(८) बांबू रोपांची निगा राखणे व संरक्षण करण्यासंदर्भात विहीत प्रपत्रात हमीपत्र/बंधपत्र.
(९) जिओ टॅग / जीआयएसद्वारे फोटो पाठविण्याबाबत हमीपत्र.
(१०) ज्या होतजमिनीवर तसेच शोताच्या बांधावर बांबू लागवड करावयाची आहे ते क्षेत्र नकाशावर हिरव्या रंगाने दर्शविणे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
हे ही वाचा :
खरीप पिक विमा अर्ज भरताय का? मग नक्की वाचा ही माहिती उपयुक्त ठरेल…
सोयाबीनला मिळाला उच्चांकी दर! सोयाबीन उत्पादकांना येणार का ‘अच्छे दिन’ ?