ताज्या बातम्या

Petrol Pump Closed | गाडी चालवताना ‘चुका’ झाल्या तर 10 वर्षांची शिक्षा! पुढील 3 दिवस पेट्रोल पंप बंद राहणार?

Petrol Pump Closed | 10 years punishment if you make 'mistakes' while driving! Will petrol pumps be closed for the next 3 days?

Petrol Pump Closed | सध्या सुरू असलेल्या ट्रकचालक आणि वाहतूकदारांच्या संपामुळे राज्यातील काही ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवू लागला आहे. हा संप 1 ते 3 जानेवारी दरम्यान असून, केंद्र सरकारच्या हिट अँड रन प्रकरणातील नव्या कायद्याच्या विरोधात चालक आंदोलन करत आहेत.(Petrol Pump Closed) या कायद्यानुसार अपघातात चालकाचा मृत्यू झाल्यास 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 5 लाख रुपये दंडाची शिक्षा होणार आहे, याचा वाहतूकदार विरोध करत आहेत.

पुण्यातही या संपामुळे काही ठिकाणी पेट्रोल पंपांवर साठा संपला असल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र, पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनने (PDA) स्पष्ट केले आहे की संपाचा पुण्यातील पेट्रोल पुरवठ्यावर मोठा परिणाम होणार नाही. जिल्हा प्रशासनाने लोणी आगारातील पेट्रोलियम टँकरना पोलीस संरक्षण देऊन त्यांची वाहतूक सुरळित केली असून, पंपांना पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा केला जात आहे.

वाचा : Electric Car | चिनी कंपनी Nio ची धक्कादायक इलेक्ट्रिक गाडी बॅटरी – एकाच चार्जवर 1000 किमीचा प्रवास!

PDA चे अध्यक्ष ध्रुव रुपारेल यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावर तीन दिवस पेट्रोल पंप बंद राहणार असल्याच्या चुकीच्या माहितीचा प्रसार होत आहे, परंतु पुण्यात सर्व पंप नेहमीप्रमाणे चालू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे (एआयपीडीए) प्रवक्ते अली दारूवाला यांनीही याच गोष्टीची पुष्टी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, “सध्या सुरू असलेल्या संपामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही. जिल्हा प्रशासन परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज असून, नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जात आहे.”

पुण्यातील काही भागात पेट्रोल पंपांवर अल्पसाठा जाणवू आला असला तरी, जिल्हा प्रशासन आणि पेट्रोलियम कंपन्या या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवणे आणि अधिकृत माहितीसाठी PDA किंवा एआयपीडीएच्या संपर्कात राहावे असे आवाहन आहे.

Web Title | Petrol Pump Closed | 10 years punishment if you make ‘mistakes’ while driving! Will petrol pumps be closed for the next 3 days?

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button