तुडतुडे :- पिल्ले व पुर्ण वाढलेले तुडतुडे कोवळी पाने, मोहोर व छोट्या फळांच्या देठातून रस शोषतात. यामुळे पाने वेडीवाकडी होतात, पालवी कोमेजते, मोहोर गळतो. तसेच छोटी फळेही गळतात. मोहोराच्या वेळी तुडतुड्यांचा प्रादुर्भाव प्रकर्षाने जाणवतो. किडीच्या नियंत्रणासाठी बागेत पुरेसा सुर्यप्रकाश राहील अशा प्रकारे फांद्यांची विरळणी करावी. वेळोवेळी बागेचे सर्वेक्षण करुन तुडतुडे पिलांच्या अवस्थेत असतानाच डायमेथोएट ३० ई.सी (१० मिली/१० ली) किंवा मेनिट्रोथिऑन (५० ई.सी (१० मिली/१० ली) कीटकनाशकाची फवारणी करावी.
मिजमाशी :- मिजमाशी कोवळ्या पालवीच्या दांड्यावर, पानांच्या देठावर, मोहोराच्या मधल्या दांड्यावर, तसेच मोहोराच्या तु-यांवर अंडी घालते व त्यातुन बाहेर येणारी पांढरट पिवळसर अळी आतील पेशींवर उपजीविका करते. परिणामी त्या ठिकाणी बारीक फुगारे काळी गाठ तयार होते. अशा असंख्य गाठी पालवीवर व मोहोरावर दिसून येतात. व त्यामुळे पालवी व मोहोर करपतो.
जून जुलै मधील पालवीवरील मिजमाशीचे नियंत्रण करण्यासाठी पावसाळ्यात उघडीप पाहून डायमेथोएट ३० ई.सी (१० मिली/१० ली) किंवा मेनिट्रोथिऑन (५० ई.सी (१० मिली/१० ली) फवारावे. या कीडीची अळी जमिनीत कोषावस्थेत जात असल्यामुळे पाऊस थांबल्यावर झाडाखालची जमीन नांगरुन त्यात मिथील पॅराथिऑनची भुकरी मिसळावी.
फुलकिडे :- फुलकि़डे पानांची खालची बाजू तसेच मोहोराचे दांडे व फुले खरवडतात यामुळे पाने वरच्या बाजूला वळून पानाचा रंग करडा बनतो. मोहोर तांबूस होऊन गळतो व फळधारणा होत नाही. फळांची साल खरवडून त्यातून येणारा रस शोषतात. फुलकिडीचा प्रादुर्भाव नोव्हेंबर – फेब्रुवारी महिन्यापर्यत दिसून येतो. फुलकिडीचा सिरटोथ्रिप्स डार्सेलिस या प्रजातीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट ३० ई.सी (१०मिली/ १० ली) किंवा फोझॅलॉन ३५ ई.सी. (१०मिली/ १० ली) या किटकनाशकाची फवारणी करावी. आंबा फळावर आढळून येणा-या थ्रिप्स प्लॅक्स व (२.५ मिली/ १० ली) व त्यानंतर आवश्यकता भासल्यास थायमेथोक्झाम २५ WG (२ग्रॅम/१० ली) या कीटकनाशकाची फवारणी करावी.
फळमाशी :- फळ पिकण्याच्या अवस्थेत असताना मादी फळांच्या सालीत अंडी घालते. त्यातून बाहेर येणा-या अळ्या गरावर उपजीविका करतात. किडीच्या नियंत्रणासाठी कीडग्रस्त फळे नष्ट करावीत. झाडाखाली जमीन नांगरावी. कामगंध सापळे वापरावेत.
रोग
भूरी :- मोहर व कच्च्या फळांची गळ होते. नियंत्रणासाठी रोगग्रस्त पाने, मोहर नष्ट करावेत. ०.२% गंधकाची पहिली फवारणी करावी. १५ दिवसांनी ०.१ % डिनोकॅपची दुसरी फवारणी करावी.
डायबॅक :- रोगग्रस्त फांद्या शेंड्यापासून वाळायला लागतात. नियंत्रणासाठी निरोगी कलमांची निवड करावी. रोगग्रस्त फांद्यांची ३ इंच खालपासून छाटणी करावी. त्यानंतर ०.३ % ऑक्झीक्लोराइडची फवारणी करावी.
WEB TITLE: Pest and disease control on mango crop