ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
इतरराशिभविष्य

या 4 राशींची लोकं असतात भयंकर रागीट, स्वतःचच करून घेतात नुकसान…

ज्योतिषशास्त्रात २७ नक्षत्र, ९ ग्रह आणि १२ राशींचे वर्णन केले आहे. या १२ राशींचे स्वामी देखील भिन्न आहेत. तसेच, या राशींशी संबंधित लोकांचे स्वभाव, व्यक्तिमत्व आणि आवडी-निवडी भिन्न असतात. आज अशा ४ राशींबद्दल माहिती पाहणार आहोत, ज्यांना छोट्या-छोट्या गोष्टींवर राग येतो. तसेच यामुळे, कधीकधी हे लोक स्वतःचे नुकसान करतात.

वाचा –

1) मेष

मेष राशीच्या लोकांना खूप लवकर राग येतो. या लोकांना समोरच्या छोट्याशा बोलण्याचं वाईट वाटतं आणि मग ते रागावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. त्यांना शांत करणे कठीण होऊन बसते. त्याचवेळी समोरून येणाऱ्याशी ते भांडतात. मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे, जो त्यांना क्रोधित करतो.

2) वृश्चिक

या राशीच्या लोकांचा स्वभावही खूप रागीट असतो. अगदी छोट्याश्या गोष्टीवरही त्यांना राग येतो. त्यांना त्यांचा सन्मान आणि आदर खूप आवडतो. कोणी दुखावण्याचा प्रयत्न केला तर ते त्याला अजिबात सोडत नाहीत. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ देखील आहे, ज्यामुळे त्यांना राग येतो. हे लोक कधीकधी रागाच्या भरात स्वतःचे नुकसान करून घेतात.

3) सिंह

सिंह राशीच्या लोकांना सर्वात जास्त राग येतो. रागाच्या भरात हे लोक सर्व मर्यादा ओलांडतात. हे लोक आपली चूक मान्य करत नाहीत. सिंह राशीवर सूर्य देवाचे शासन आहे, ज्यामुळे त्यांना राग येतो. त्यांचा जोडीदार, प्रियकर किंवा मित्र यांना त्यांच्या रागाचा सामना करावा लागतो. हे लोक छोट्या छोट्या गोष्टींला मोठ करतात.

4) मिथुन

या राशीच्या लोकांना राग लवकर येत नाही पण जेव्हा येतो तेव्हा तो ज्वालामुखीसारखा असतो. ज्याला शांत करणे खूप कठीण होऊन बसते. या लोकांच्या रागाची भीती सर्वांनाच आहे. कोणतीही गोष्ट किंवा काम त्यांच्या मनाप्रमाणे झाले नाही तर त्यांचा राग येतो. ते अनेकदा रागाच्या भरात असे काही करतात की त्यांना नंतर पश्चाताप करावा लागतो.

हे ही वाचा –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button