कृषी तंत्रज्ञान

Pearl farming: दर महिन्याला तीन लाख रुपये हवेत मग करा ‘मोत्याची शेती’..

Pearl farming: Rs 3 lakh per month in the air then do 'pearl farming'

जर तुम्हाला कमी पैशांमध्ये अधिक चांगला नफा हवा असेल तर तुम्ही मोतीची शेती (Pearl farming) करू शकता. अश्या प्रकारची शेती (Agriculture) करण्यासाठी 50% सरकारी अनुदान देखील प्राप्त होईल. चला जाणून घेऊया या बद्दल सविस्तर माहिती…

अलीकडच्या काळामध्ये शेतीसोबतच विविध प्रयोग केले जाता आहेत, मत्स्यपालन, बदकपालन, असे (Fisheries, duck farming, etc.) विविध व्यवसाय केले जातात. अलीकडच्या काळामध्ये मोत्याची शेती देखील मोठा फायदा मिळवून देणारी आहे, 30 हजार रुपये गुंतवणूक (Investment) केल्यास तीन लाखापर्यंत नफा प्राप्त होतो.

मोतीची शेती करण्याकरिता आपणास एक तलाव, (Lake) शेततळे म्हणजेच पाण्याचासाठा असणे आवश्यक आहेत, ऑयस्टर (Oyster) आणि योग्य प्रशिक्षण आवश्यक आहे. भारतात बहुतांशी राज्यामध्ये अशा प्रकारची शेती केली जाते, महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी मोतीची शेती करण्यात येते व त्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रशिक्षणाची (Of training) सुविधा देखील उपलब्ध आहे.

असे बनतात मोती…
प्रथम ऑयस्टरंना जाळीमध्ये बांधले जाते आणि 10 ते 15 दिवस तलावामध्ये ठेवले जाते, जेणेकरून ते त्यानुसार त्यांचे वातावरण (Atmosphere) तयार करू शकतील, ज्यानंतर त्यांना बाहेर काढले जाईल आणि शस्त्रक्रिया केली जाईल. शस्त्रक्रिया म्हणजे ऑयस्टरच्या आत एक कण किंवा साचा घातला जातो. या बुरशीवर कोटिंग केल्यानंतर ऑयस्टर थर बनविला जातो, जो नंतर मोती बनतो.

वाचा : तुम्हाला देशातील सर्वाधिक महाग भाजी कोणती आहे माहित आहे का? ‘या’ राज्यामध्ये पिकते ही भाजी, किंमत वाचून व्हाल हैराण…

खर्च :
सर्वसाधारणपणे एक ऑयस्टरसाठी पंचवीस ते तीस रुपयेचा खर्च येतो व त्या मधून पडणाऱ्या मोतीची किंमत दोनशे ते अडीचशे रुपये इतकी असते. मोती ची गुणवत्ता अधिक चांगली असेल तर यापेक्षा अधिक देखील पैसे मिळू शकतात. तुम्ही एक एकर तलावात 25 हजार शिंपले (Mussels) टाकले तर त्याची किंमत सुमारे 8 लाख रुपये इतकी होते.

ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास, तुमच्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा त्याचप्रमाणे या प्रशिक्षणा (Training) विषयी माहिती हवी असल्यास मी E शेतकरीला तसे कळवा आम्ही आपणास सर्व माहिती पुढील भागामध्ये कळवू “शेतकरी हित हेच आमचे ध्येय” त्यासाठी मी E शेतकरी वाचत राहा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button