ताज्या बातम्या

Paytm Share| अरे वाह! बायबॅकच्या बातमीने आज पेटीएमचा शेअर वाढला 7 टक्क्यांपर्यंत, निर्णयाचा किती झाला नफा?

Paytm Share | पेटीएमचे शेअर्स या वर्षी आतापर्यंत 60 टक्क्यांपर्यंत तुटल्याने गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर आज आनंद दिसत आहे. आज सकाळपासून पेटीएमच्या शेअरमध्ये (Paytm Share) तेजी पाहायला मिळत आहे. पेटीएम (Paytm) च्या शेअर्समुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. कंपनीच्या शेअर्सची (Share Market) घसरण थांबण्याचे नाव घेत नाही. शेअरची घसरण थांबवण्यासाठी आता कंपनी मोठा निर्णय घेणार आहे.

बायबॅक करण्याचा निर्णय
स्टॉक एक्स्चेंजवर लिस्टिंग झाल्याच्या अवघ्या एका वर्षात कंपनीने शेअर बायबॅक (Paytm Share Buyback) करण्याचा निर्णय घेतला आहे. 13 डिसेंबर रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक बोलावण्यात आली असून, त्यात शेअर (Financial) बायबॅकबाबत निर्णय घेतला जाणार आहे. शेअर बायबॅकची बातमी समोर आल्यानंतर शुक्रवारी शेअर बाजार (Share Market) सुरू झाल्यापासून पेटीएमच्या शेअर्सने 7 टक्क्यांनी उसळी घेत 544 रुपयांची पातळी गाठली. (Paytm share price today)

वाचाबाप रे! महाराष्ट्रावर अस्मानी वादळाचं मोठं संकट, मुसळधार पावसासह थेट ‘या’ 13 जिल्ह्यांना अलर्ट

गुंतवणूकदारांना होणार फायदा
पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशनने स्टॉक एक्सचेंजला सांगितले आहे की, संचालक मंडळाची बैठक 13 डिसेंबर रोजी होणार आहे, ज्यामध्ये बायबॅकचा निर्णय घेतला जाईल. कंपनीची सध्याची रोकड आणि आर्थिक (Financial) स्थिती लक्षात घेता बायबॅक भागधारकांसाठी फायदेशीर ठरेल अशी व्यवस्थापनाची अपेक्षा आहे.

IPO किमतीच्या तुलनेत हा स्टॉक 75 टक्क्यांनी आला खाली
पेटीएमच्या स्टॉकची सूची नोव्हेंबर 2021 मध्ये झाली. त्याची इश्यू किंमत प्रति शेअर 2150 रुपये होती. हा शेअर बीएसईवर रु.1955 वर लिस्ट झाला होता. दुसरीकडे, तो लिस्टिंगच्या दिवशी 1564.15 रुपयांवर बंद झाला, म्हणजे IPO किंमतीपासून 27.25 टक्के सूट देऊन. तेव्हापासून शेअरमध्ये सातत्याने घसरण सुरू आहे. लॉक-इन कालावधी संपल्यानंतर 2150 रुपयांचा शेअर 440 रुपयांपर्यंत घसरला. सध्या हा शेअर त्याच्या इश्यू किमतीपेक्षा 75% खाली ट्रेडिंग करत आहे. 1.39 लाख कोटी रुपयांचे मार्केट कॅप असलेल्या कंपनीचे मार्केट कॅप आता 34,473 कोटी रुपये झाले आहे.

वाचाबाप रे! महाराष्ट्रावर अस्मानी वादळाचं मोठं संकट, मुसळधार पावसासह थेट ‘या’ 13 जिल्ह्यांना अलर्ट

बायबॅकमुळे वाढली किंमत
कंपनीने शेअर बायबॅक केल्याची बातमी समोर आल्यानंतर पेटीएमच्या शेअर्सने आज वेग पकडला. पेटीएमचे शेअर्स आज NSE वर 544 रुपयांवर उघडले, जवळपास 7 टक्क्यांनी वाढून पेटीएमचे शेअर्स 4.56 टक्क्यांच्या वाढीसह 531.15 रुपयांवर व्यवहार करत होते. पेटीएमचा शेअर गेल्या एका महिन्यात 17.57 टक्क्यांनी घसरला आहे. त्याचप्रमाणे गेल्या सहा महिन्यांत शेअरच्या किमतीत 14.86 टक्क्यांनी घसरण झाली आहे. 2022 मध्ये पेटीएमचा हिस्सा 60.40 टक्क्यांनी घसरला आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..


हेही वाचा:

Web Title: Paytm shares rose up to 7 percent today on the news of the buyback, how much profit did the decision make?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button