Election | पाच राज्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा! तारखाही झाल्या जाहीर; जाणून घ्या कधी लागणार निकाल?
Paving the way for five state elections! The dates were also announced; Know when the result will be?
Election | भारतीय निवडणूक आयोगाने आज पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत.
मिझोराममध्ये ७ नोव्हेंबरला मतदान
मिझोराममध्ये ७ नोव्हेंबरला मतदान होईल. ३ डिसेंबरला निकाल लागेल.
छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान
छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान होईल. पहिल्या टप्प्यात ७ नोव्हेंबरला, दुसऱ्या टप्प्यात १७ नोव्हेंबरला मतदान होईल. ३ डिसेंबरला निकाल लागेल.
राजस्थान आणि तेलंगणामध्ये २३ नोव्हेंबरला मतदान
राजस्थान आणि तेलंगणामध्ये २३ नोव्हेंबरला मतदान होईल. ३ डिसेंबरला निकाल लागेल.
वाचा : One Country One Election | “एक देश एक निवडणूक” कमी होईल नागरिकांची पिडवणूक’ ! ऐन निकलादिवशीचं मुख्य आयुक्तांच ‘हे’ महत्त्वाचं विधान चर्चेत…
मध्य प्रदेशमध्ये १७ नोव्हेंबरला मतदान
मध्य प्रदेशमध्ये १७ नोव्हेंबरला मतदान होईल. ३ डिसेंबरला निकाल लागेल.
निवडणुका महत्त्वाच्या
पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुका या लोकसभा निवडणुकीआधीच्या सेमीफायनल मानल्या जात आहेत. पाच राज्यांच्या निकालामध्ये मतदार कोणाला संधी देईल, यावर लोकसभेतील चित्र स्पष्ट होईल असं बोललं जात आहे. त्यामुळे पाच राज्यातील निवडणुका महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. निवडणूक आयोगाने निवडणुका पारदर्शक आणि निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले आहे.
हेही वाचा :
Web Title: Paving the way for five state elections! The dates were also announced; Know when the result will be?