Pantpradhan Kisan Samman Nidhi : केंद्र सरकार देणार, शेतकऱ्यांना 30 जूनपर्यंत 4000 रुपये मिळवण्याची संधी…
Pantpradhan Kisan Samman Nidhi: Central government will give farmers a chance to get Rs 4,000 till June 30
केंद्र सरकारने (Central Government) शेतकऱ्यांसाठी सर्वात उत्तम राबवलेली योजना म्हणजे ‘ पंतप्रधान किसान सन्मान निधी (Prime Minister’s Farmers Honors Fund) योजना’ होय. या योजनेअंतर्गत पीएम शेतकरी सन्मान निधी योजना देशातील गरीब शेतकऱ्यांना (Farmers) बी-बियाणं, (Seeds) खतं खरेदी करण्याकरता निधी मिळावा याकरता राबवली जाते.
हे ही वाचा :एकच वनस्पती त्याचे दोन फायदे! जनावरांसाठी चारा आणि पिकांना खत म्हणून उपयुक्त जाणून घ्या; या वनस्पती बद्दल सर्व माहिती…
आतापर्यंत केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर आठ हप्ते पाठवलेले आहेत, या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सहा हजार रुपये प्रति वर्ष दिले जातात.ज्या शेतकऱ्यांकडे कमीत कमी 2 हेक्टर शेतीयोग्य जमीन आहे असे व्यक्ती या योजनेस लाभार्थी आहे. त्यांना हे 6000 पैसे पाठवले जातात.
हे ही वाचा : अबब! गाईच्या पोटातून निघाले ‘इतके’ किलो प्लास्टिक…
या योजनेअंतर्गत एकूण 9.5 कोटी शेतकऱ्यांना 20 हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. दरम्यान अद्यापही काही शेतकरी असे आहेत जे पात्र तर आहेत मात्र त्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही. अशा शेतकऱ्यांना 30 जूनपर्यंत डबल संधी सरकार देत आहे. या तारखेपर्यंत नोंदणी केल्यास तुमच्या खात्यात दोन हप्ते अर्थात 4000 रुपये येऊ शकतात. तरी अद्याप कोणी या संधीचा फायदा घेतला नसेल तर या योजनेचे लाभार्थी होण्याकरिता पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा फॉर्म भरणे आवश्यक आहे.
हे ही वाचा :
1)मी E शेतकरी बोलतोय, शेतीचा शोध कधी व कोठे लागला ठाऊक आहे का?