Pan Card Linking | तुम्ही पॅन कार्डला आधार लिंक करायला करताय विलंब अन् विलंब शुल्कातून सरकार कमवतंय कोट्यवधी रुपये
Pan Card Linking | केंद्र सरकारने गेल्या वर्षी पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम मुदत 30 जून 2023 पर्यंत निश्चित केली होती. मुदत निघून गेल्यावरही अनेक करदात्यांनी (Pan Card Linking) पॅन-आधार लिंकिंग पूर्ण केले नाही. या विलंबामुळे आकारण्यात आलेल्या शुल्कातून सरकारला 600 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे.
सोमवारी संसदेत सादर केलेल्या माहितीनुसार, 11.48 कोटी चालू पॅन कार्ड अद्याप आधारशी लिंक केलेले नाहीत. 1 जुलै 2023 पासून, ज्यांनी पॅन-आधार लिंकिंग पूर्ण केले नाही त्यांचे पॅन कार्ड निष्क्रिय करण्यात आले आहेत.
वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी एका लेखी उत्तरात सांगितले की, 29 जानेवारी 2024 पर्यंत 11.48 कोटी पॅन कार्ड आधारशी लिंक नसल्याचे आढळून आले आहे. 30 जून 2023 च्या मुदतीनंतर पॅन-आधार लिंकिंग करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून 1000 रुपये दंड आकारण्यात आला. 1 जुलै 2023 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत 601.97 कोटी रुपये दंडाच्या स्वरूपात जमा झाले आहेत.
वाचा | Budget 2024 | शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात मोठा दिलासा; पीएम किसान योजनेच्या रकमेत होणार वाढ
यामुळे, पॅन-आधार लिंकिंगसाठी सरकारने निश्चित केलेली अंतिम मुदत अनेकांसाठी फायदेशीर ठरली नाही. वेळेवर लिंकिंग न केल्याने नागरिकांना दंड भरावा लागला आणि सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळाला.
Web Title | Pan Card Linking | While you link Aadhaar to PAN card, government earns crores of rupees from delay and late fees
हेही वाचा